ठाणे - पहाटेपासूनच ठाण्यात पुन्हा संततधार पाऊस सुरु असल्याने मध्य रेल्वेच्या गाड्या अप आणि डाऊन मार्गावरी १५-२० मिनिटे उशीरा धावत आहेत. ठाण्यात पहाटे पासूनच पावसाने जोर धरलायमुळे ठाण्यात काही ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. काही झाडं गाड्यांवर पडल्याने अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे.
उथळसर मधील मखमली तलाव, नवपाडातील सरस्वती शाळा, वागळे स्टेट येथील कामगार रुग्णालय, नवपाडा मधील मंडलिक गॅस सर्व्हिस, साकेत रोडवरील जलाराम अपार्टमेंट, माजीवडा आणि उथळ सर नाका अशा अनेक सखल भागात तुरळक पाणी साचले होते. तीन हाक नाका, वागळे इस्टेट परिसर, घोडबंदर रोड, गायमुख, ब्रम्हांड या सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार कम बॅक केल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी पहायला मिळाली