ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत ३ तारखे नंतर जर मशिदीवरील भोंगे उतरवले नाही. तर, तेवढ्याच मोठ्या आवाजात हनुमान चालिसा पठण ( Hanuman Chalisa Controversy ) करण्याचे आवाहन सर्व मनसैनिकांना केले आहे. त्यानंतर मनसैनिक हनुमान चालिसा पठण करण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. ठाणे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ठाणे शहरात ठिकठिकाणी प्रतिकात्मक हजारो हनुमान चालिसा पुस्तिकांच आज मोफत वाटप करण्यात आले ( Mns Activist Hanuman Chalisa Book Allocation ) आहे.
ठाण्यातील सर्व मंदिर, दुकाने, घरा घरात जाऊन दहा हजार हनुमान चालिसा पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याचे मनसे पदाधिकारी स्वप्निल महिंद्रकर यांनी सांगितले आहे. ३ तारखेनंतर जर भोंगे उतरवले गेले नाहीत तर राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाच पालन करण्यास आम्ही सज्ज असल्याचे देखील मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यासोबत ठाणे पोलिसांनी देखील स्थानिक पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत हे देखील पाहिले जात आहे.
अल्टिमेटमपूर्वी कार्यकर्ते आणि पोलीसही सक्रिय - राज ठाकरेंनी दिलेल्या ईदच्या अल्टिमेटपूर्वी मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर फिरून वातावरण निर्मिती करताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, पोलिसांकडून मनसेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांवर कोणकोणते गुन्हे आहेत, याची माहिती जमा करून त्यावर एक अहवाल बनवला जात आहे.
हेही वाचा - Shivaji Maharaj Samadhi Controversy : 'लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीत भ्रष्टाचार केला'