ETV Bharat / city

Kalyan Police : अर्धा डझन गुन्हेगारांना बेड्या; १५ लाखांच्यावर मुद्देमाल हस्तगत .. - कल्याण पोलिसांनी केला १३ लाखाचा माल जप्त

कल्याण बाजारपेठेत बाजारहाट करणाऱ्या महिलांच्या बॅग, पर्स मधून दागिनेसह रोकड लंपास करण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास व एका सीसीटीव्ही फुटेजमुळे सराईत गुन्हेगार दोन महिलांचे चोरीचा प्रकार (Kalyan Police arrested lady thief) उघडकीस आला आहे.

Kalyan Police
Kalyan Police
author img

By

Published : Jan 25, 2022, 3:16 PM IST

ठाणे : कल्याण शहरात बाजारहाट करणाऱ्या महिलांना सावज करीत त्यांच्या बॅग, पर्समधून ब्लेडच्या साह्याने रोकड व दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरटया महिलासह सोनसाखळी, बाईक लंपास करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना अटक केली. आठ दिवसात शोध घेऊन दोन डझन गुन्ह्यांतील अर्धा डझन गुन्हेगारांना महात्मा फुले पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. अटक आरोपीकडून दागिने, मोबाईल, आणि दुचाक्या असा १५ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आतापर्यत जप्त केला आहे.

गुन्हेगार महिलांचे सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग
कल्याण बाजारपेठेत बाजारहाट करणाऱ्या महिलांच्या बॅग, पर्स मधून दागिनेसह रोकड लंपास करण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास व एका सीसीटीव्ही फुटेजमुळे सराईत गुन्हेगार दोन महिलांचे चोरीचा प्रकार (Kalyan Police arrested lady thief) उघडकीस आला आहे. आरती दयानंद पाटील शालन उर्फ शालिनी संजय पवार असे अटक केलेल्या महिला आरोपींचे नावे आहे. या दोघेही सोनाराच्या दुकानात दागिने खरेदी करणाऱ्या महिलांना लक्ष करीत होते. एखादी महिला दुकानातून बाहेर पडताच त्या दोघेही सावधपणे पाठलाग त्यांच्या बॅग, पर्सला ब्लेड मारून त्यामधील दागिने व रोकड लंपास करीत होत्या. गेल्या दोन महिन्यापासून अश्या प्रकारे ९ गुन्हे केल्याचे आतापर्यत उघडकीस आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी आरतीही सधन घरातील असून तिचा पती सरकारी कर्मचारी आहे. ती केवळ महागड्या साड्या व आभूषणावर चोरीचा पैसे खर्च करीत असल्याचे समोर आले. या दोघी आरोपीकडून १५८ ग्रॅम सोन्याच्या दागिण्यासह रोकड असा ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चार सराईत गुन्हेगार अटक
एक तरुण योगा क्लासला आदर्श हिंदी हायस्कूल गेट समोरून जात असताना त्याच्या हातातील मोबाईल पळवून आरोपी पसार झाला. या गुन्ह्यातील आरोपीला चोरांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून पकडून आणले आहे. यासाठी महात्मा फुले पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन आणि पळून जाणाऱ्या चोराचा पाठलाग करत त्याला पकडले आहे. मुस्तफा जाफर असे सराईत आरोपीच नाव असून त्याने ८ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात काळा तलाव येथून संशयित रित्या पळून जाणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. साजिद अन्सारी असे आरोपीचं नाव असून एकूण चार दुचाकी चोरी केल्याची कबुली देत त्याचे साथीदार समीर हाशमी आणि सालील लुंड यांचा देखील सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. तर आणखी एक दुचाकी चोरीचा पर्दाफाश केला असून उल्हासनगर येथे राहणारा आरोपी आकाश यशवंते आणि खडेगोळवली येथे राहणारा जॅक बिका यांना अटक केली आहे.

आणखी गुन्हे उकल होण्याची शक्यता..
आठ दिवसात एकूण २४ गुन्ह्याचा उलगडा करत दोन महिला आरोपी, सराईत गुन्हेगार असलेल्या चार आरोपी यांना अटक करून त्यांच्याकडून एकूण २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने , २ मोबाईल फोन , ९ दुचाकी व रोख रक्कम असा १५ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. या अटक आरोपीकडून आणखीही गुन्हे उकल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.
हेही वाचा - Sachin Waze : स्फोटके प्रकरणात एनआयएने लावलेले यूएपीए कलम रद्द करा, सचिन वाझेची मुंबई उच्च न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.