ठाणे - 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी टीव्ही पाहत असताना मोबाइलवर गेम खेळत होती. त्यावेळी आईने टीव्ही पाहत असताना मोबाइलवर गेम खेळू नको असे दरडावले. त्यामुळे आई आपल्यावर रागावल्याने या मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील न्यू टावरे कंपाऊंड परिसरातील एका घरात घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कोमल रवींद्र सलादल्लू (वय, 15 ) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे घरातच राहू कुटुंब टीव्ही किंवा मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. अशीच मृत कोमल ही रविवारी घरांमध्ये टीव्ही पाहत होती. त्याच वेळी ती मोबाइलवर गेम खेळत असताना तिची आई तिच्यावर रागवली होती. याच गोष्टीचा राग येऊन तिने पहिल्या मजल्यावरील घरात जाऊन सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत कोमलचा मृतदेह भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, मृत मुलीच्या आईने कोणतीही तक्रार दिली नसल्याने भोईवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप ५ न्यूज-
'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर सोडला रोजा
अंध आईच्या हातून निसटला मुलगा, पडला रेल्वे ट्रॅकवर, पॉइंटमनने वाचवला जीव
साताऱ्यातील यवतेश्वर घाटात उडी घेऊन १६ वर्षीय युवतीची आत्महत्या, आधारकार्डवरुन पटली ओळख
लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक
नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला