ठाणे - नौपाडय़ातील विष्णुनगर भागात अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. यावेळी खोदकामादरम्यान जेसीबीचा धक्का लागल्याने जमीनीखालील गॅसची लाईन फुटली; आणि गळती सुरू झाली. मात्र, या ठिकाणी गर्दी नसल्याने मोठी हानी टळली. यामुळे या परिसरातील जवळपास 1500 नागरिकांना गॅस बंदचा फटका बसला. सायंकाळी ही लाईन दुरुस्त करण्यात आली. यानंतर प्रवाह पुन्हा सुरू करण्यात आला.
विष्णु नगर भागातील यश आनंद सोसायटी जवळील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण चालू आहे. खोदकामादरम्यान जेसीबीचा धक्का लागला. यामुळे महानगर गॅसची पाईपलाईन फुटली. यावेळी वर्दळ कमी असल्याने मोठी हानी टळली आहे.
हेही वाचा - मुंब्रामध्ये #CAA आणि #NRC विरोधात ठिय्या आंदोलन
संबंधित घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच महानगर गॅसचे पथकही या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर ही लाईन बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी ही सेवा पूर्ववत करण्यात आली.