ठाणे - आज राज्यभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध प्रकारे गॅस व इंधन दरवाढी विरोधात आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून आज कल्याण मधील तृतीयपथ्यांनाही अनोखे आंदोलन करीत मोदी सरकारचा धिक्कार केला. गॅस व इंधन दरवाढीचा फटका तृतीयपथ्यांनाही बसला आहे.
भर चौकात चूल पेटवून थापल्या भाकरी-
पेट्रोल, डिझेल, गॅससह इंधनदरवाढी विरोधात राष्ट्रवादीने केंद्र सरकारला धारेवर धरत राज्यात आंदोलन पुकारलं आहे. या पार्श्वभूमीवर आज कल्याण शीळ रोड वरील टाटा नाका परिसरात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकत्यांसह तृतीयपथ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. तसेच मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करत इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
या आंदोलनात एलजीबीटी सेलच्या प्रदेश सचिव तृतीयपंथीय माधूरी शर्मा म्हणाल्या, ज्यांनी लग्नच केलं नाही, त्यांना महागाईमुळे संसाराची झळ पोहोचणार नाही. मात्र खरी महागाईची झळ तर सर्वच स्थरातील संसरा करणाऱ्या महिलानांच बसत आहे.
हेही वाचा- शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या हिताचे कायदे करणार - अजित पवार