ठाणे - कामगार नगरी तसेच दाट लोकवस्तीचे शहर म्हणून भिवंडी शहराची ओळख आहे. या शहरात शुक्रवारपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, शनिवारी शहरात कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. एका 65 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा... आनंदाची बातमी! सहा महिन्याच्या बाळाचा कोरोनावर विजय
भिवंडीतील या रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. शहरातील हा पहिला कोरोनाबाधीत रुग्ण काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे एका मशिदीत कार्यक्रमात गेला असल्याची माहिती समोर आली आहे.
सुदैवाने या रुग्णाला पाच दिवसांपूर्वीच भिवंडीतील केंद्रात क्वरंटाईन करण्यात आले होते. मात्र, आता तो कोरोनाबाधित असल्याने त्याच्या कुटुंबातील दोन महिला एक पुरुष आणि एका लहान मुलाला देखील क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. हा रुग्ण राहत असलेला आजूबाजूचा एक किलोमीटर पर्यंतचा परिसर महापालिकेने सील केला आहे. भिवंडीत कालपर्यंत एकही कोरोबाबधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र. आता कोरोनाने भिवंडीत शिरकाव केल्याने शहरासह ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.