नवी मुंबई - डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल परिसरातील हॉस्पिटलच्या नवीन इमारतीत आग लागली आहे. संबंधित आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांना आगीवर ताबा मिळवण्यात यश आले आहे. हे हॉस्पिटल मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्याने काही काळ वाहतुकीला अडचण झाली होती.
आज दुपारच्या सुमारास थर्माकाॅल मटेरियलला आग लागली; आणि काहीच वेळात आगीने भीषण रूप धारण केले. इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने या ठिकाणी कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी झालेली नाही. आग लागल्याचे कळताच डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल प्रशासनाने अग्निशामक दलाला त्वरित पाचारण केले. यामुळे वेळेत ताबा मिळवण्यात यश आले आहे.