ETV Bharat / city

Building Fire Thane: २३ मजली इमारतीमध्ये आग लागताच रहिवाशांनी बाल्कनीतून साडीच्या मदतीने उतरत वाचवला जीव; व्हिडिओ व्हायरल - कल्यााण खडकपाडा फ्लॅट आग

कल्याणच्या खडकपाडा भागात हायप्रोफाईल असलेल्या २३ मजली मोहन अल्टीजा या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये अचानक आग (Kalyan Khadakpada flat fire) लागली होती. आगीच्या भक्षस्थानी सापडून दोन फ्लॅटमधील संसाराची राखरांगोळी झाली असतानाच, येथील रहिवाशी कुटुंबीयांनी बाल्कनीतून साडीच्या आधारे खालच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उतरत आपला जीव (saving lives from fire) वाचविला. अंगाचा थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (23 story building fire video viral)

Building Fire Thane
Building Fire Thane
author img

By

Published : Oct 3, 2022, 5:02 PM IST

ठाणे : कल्याणच्या खडकपाडा भागात हायप्रोफाईल असलेल्या २३ मजली मोहन अल्टीजा या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये अचानक आग (Kalyan Khadakpada flat fire) लागली होती. आगीच्या भक्षस्थानी सापडून दोन फ्लॅटमधील संसाराची राखरांगोळी झाली असतानाच, येथील रहिवाशी कुटुंबीयांनी बाल्कनीतून साडीच्या आधारे खालच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उतरत आपला जीव (saving lives from fire) वाचविला. अंगाचा थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (23 story building fire video viral)

ठाण्यात इमारतीला आग लागल्यानंतर बाल्कनीतून साडीच्या मदतीने उतरताना रहिवाशी

शाॅर्ट सर्किटमुळे लागली आग- कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील वायलेनगर येथील २३ मजली मोहन अल्टिजा इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पांडे कुटूंब राहत असून त्याच्या घरात रविवारी सकाळी सहा वाजता शाॅर्ट सर्किट होऊन आग लागली होती. आगीत दोन फ्लॅटमधील साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे, सकाळीच धुके असल्याने इमारतीला धुक्याने वेढले आहे असे सुरुवातीला रहिवाशांना वाटले. धुके वेगाने आकाशाच्या दिशेने का जाते म्हणून सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा यांना संशय आला. त्यांनी आणि पत्नीने गच्चीत येऊन पाहिले तर त्यांना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे दिसले. तो आगीचा धूर वरच्या दिशेने येत आहे असे समजताच अध्यक्ष शहा, इमारती मधील रहिवासी विजय इंगळे यांनी तात्काळ अग्निशमन जवान, पोलिसांना ही माहिती दिली. घरात फर्निचर असल्याने आगीचा भडका उडाला होता.

चार घरांचे दार जळाले- शाॅर्ट सर्किटमुळेच आग लागल्याचे अध्यक्ष शहा यांनी सांगितले. आग लागलेल्या घरासमोरील चार रहिवाशांच्या घरांचे दरवाजे ज्वालांनी जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ तिसरा माळा गाठून पाण्याचा मारा करुन आग विझवली. आग लागताच सोसायटीचे उद्वाहन स्वयंचलित बंद झाले होते. या आगीची धग १८ व्या माळ्यापर्यंत लागत होती, असे अध्यक्ष शहा यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.