ETV Bharat / city

विना परवाना फाईट! पोलिसांनी केले वातावरण टाईट; आयोजकावर गुन्हा दाखल - भाजप आमदार महेश चौघुले

भिवंडी शहरातील शांतीनगर पिराणी पाडा परिसरात असलेल्या यहीया कंपाऊंड येथे भिवंडी फाईट क्लबच्या वतीने विना परवानगीने फाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

विना परवाना फाईट
विना परवाना फाईट
author img

By

Published : Dec 14, 2020, 3:14 AM IST

Updated : Dec 14, 2020, 5:07 AM IST

ठाणे - भिवंडी शहरातील शांतीनगर पिराणी पाडा परिसरात असलेल्या यहीया कंपाऊंड येथे भिवंडी फाईट क्लबच्या वतीने विना परवानगीने फाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन फायटर एका रिंगमध्ये प्रवेश करून फाईट करत असतानाच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन येथील वातावरण टाईट केले. त्यांनतर शांतीनगर पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. सलमान अब्दुल कयुम, असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे.

भिवंडीत फाईट स्पर्धेचे आयोजन
फाईटची स्पर्धा पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी-

सर्वत्र कोरोनाचा काळ सुरु असतानाच भिवंडीतील फाईट क्लबच्या आयोजकांनी शासनाने जाहीर केलेल्या कोरोनाचे कोणत्याही नियमांचे पालन केले नाही. स्पर्धकांनी चेहऱ्यावर मास्क नव्हताच. सोशल डिस्टसिंगचा देखील फज्जा उडवला होता. विशेष म्हणजे ही फाईटची स्पर्धा पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

भाजप आमदारांच्या हस्ते फाईट स्पर्धेला सुरवात; आमदारांचा मुलगाही सहभागी

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश चौघुले यांच्या हस्ते फाईट स्पर्धेला सुरवात झाली. विशेष म्हणजे या फाईट स्पर्धेत आमदारांचा मुलगाही सहभागी झाला होता. मात्र पोलिसांना या बेकायदा फाईट स्पर्धेची माहिती मिळताच पोलिसांनी येथील वातावरण टाईट केले. याप्रकरणी फाईट क्लबचे आयोजक सलमान अब्दुल कयुम यांच्या विरोधात शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा- आजपासून हिवाळी अधिवेशन; 6 अध्यादेश, 10 विधेयके मांडणार - मुख्यमंत्री

Last Updated : Dec 14, 2020, 5:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.