ETV Bharat / city

fierce fire High Street Mall : हाय स्ट्रीट मॉलच्या स्नॅक्स कॉर्नरला भीषण आग; अग्निशमन दलाचे चार जावान अस्वस्थ

ठाण्याच्या कापूरबावडी हाय स्ट्रीट मॉलच्या ( High Street Mall ) तिसऱ्या माळ्यावर असलेल्या सिनेप्लेक्स मुव्ही थिएटरच्या कॅफेट एरिया (स्नॅक्स कॉर्नर) ( fierce fire Snacks Corner) परिसरात शनिवारी रात्री 11 ला भीषण आग ( Fierce fire ) लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे तीन फायरमन हे श्वास गुदमरल्याने अत्यावस्थ ( Three firefighters suffocated ) झाले आहेत.

High Street Mall
हाय स्ट्रीट मॉल
author img

By

Published : Jun 26, 2022, 1:33 PM IST

Updated : Jun 26, 2022, 4:59 PM IST

ठाणे - ठाण्याच्या कापूरबावडी हाय स्ट्रीट मॉलच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या सिनेप्लेक्स मुव्ही थिएटरच्या कॅफेट एरिया (स्नॅक्स कॉर्नर) परिसरात शनिवारी रात्री 11 ला भीषण आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे तीन फायरमन हे श्वास गुदमरल्याने अस्वस्थ झाले आहेत. तर, एक फायरमन हाताला काच लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. सर्वांना उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलेआहे. या अग्निकांडात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ठाण्यात शॉर्टसर्किटने आगी लागण्याच्या डझनभर घटना घडल्या आहेत. शनिवारी रात्री अचानक कापूरबावडी परिसरातील हाय स्ट्रीट मॉलच्या तिसऱ्या माळ्यावरील स्नॅक्स कॉर्नर परिसरात भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती सिनेप्लेक्स मुव्ही थिएटरचे मॅनेजर सुजीत सरावडे, सिनेप्लेक्सचे रिजनल मॅनेजर अविनाश सावंत यांनी दिली.

आग विझविण्यासाठी फौजफाटा दाखल - कापूरबावडी हाय स्ट्रीट मॉलच्या तिसऱ्या माळ्यावरील स्नॅक्स कॉर्नर परिसरात भीषण आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी, जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप-आयुक्त व अधिकारी आणि कर्मचारी तसेच कापूरबावडी पोलीस अधिकारी, कर्मचारी आदींनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू केले.

हेही वाचाव - Sanjay Raut On Maharashtra Politics :आमचा फक्त इशारा करण्याचा अवकाश... राऊतांचा थेट इशारा

आगीचे रौद्ररूप-धुराचे लोळ - आगीचे भीषण स्वरूप आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल २- रेस्क्यू वाहन, १- जम्बो वॉटर टँकर आणि २ फायर वाहनाच्या साहायाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आग भडकत होती. तर धुराचे लोळ उठले होते. त्यात अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. याच प्रयत्नात धुराच्या लोळात फायरमन सुनील दराडे, दीपक बोराडे, विशाल पाटील, हे श्वास गुदमरल्याने अस्वस्थ झाले. तर, फायरमन जे. पी. वाघ याच्या हाताला काच लागल्याने जखमी झाले. अत्यावस्थ आणि जखमी अग्निशमन दलाच्या फायरमन याना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले.

पाच तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण - शनिवारी रात्री 11-20 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र तीन फायरमन गुदमरल्याने तर एक फायरमन जखमी झाला. या व्यतिरिक्त वित्तीय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, अग्नीशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, इतर विभागांनी रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. तर आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.

हाय स्ट्रीट मॉलच्या स्नॅक्स कॉर्नरला भीषण आग

हेही वाचाव - Rashmi Thackeray in Action : रश्मी ठाकरे उतरल्या मैदानात, निवडक आमदारांच्या पत्नीशी संपर्क

Last Updated : Jun 26, 2022, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.