ETV Bharat / city

बंदुकीचा धाक दाखवून मीरा रोडवरील सोन्याचे दुकान लुटले

robbed
robbed
author img

By

Published : Jan 7, 2021, 5:46 PM IST

Updated : Jan 7, 2021, 7:49 PM IST

17:38 January 07

बंदुकीचा धाक दाखवून मीरा रोडवरील सोन्याचे दुकान लुटले

मीरा भाईंदर - मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर 4मध्ये असलेल्या एस. कुमार गोल्ड अ‌ॅण्ड डायमंड्स ज्वेलरी शॉपमध्ये भरदिवसा दरोडा पडला आहे. बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

पायी धावत स्टेशनच्या दिशेने झाले पसार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी दोनच्या सुमारास मोटार सायकलहून दरोडेखोर ग्राहक बनून आले होते व दुकानात दाखल झाले. बंदुकीच्या धाक दाखवून दरोडा टाकून पसार झाले. एका मोटारसायकलवर दोन आरोपी पसार झाले तर दोन दरोडेखोरांना काही नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून आपली मोटरसायकल जागेवर सोडून पायी धावत स्टेशनच्या दिशेने पसार झाले. घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

सोने घेण्याचे केले नाटक

मीरा भाईंदर वसई विरार परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले, की दुपारी दोनच्या सुमारास दोन मोटारसायकल वरून चार जण आले असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. सोने घेण्याचे नाटक करत या चौघांनी ज्वेलरीच्या दुकानात प्रवेश केला. किती सोने गेले आहे त्याची संपूर्ण माहिती घेत आहोत. दोन जण मोटारसायकल वरून पळ काढण्यात यशस्वी झाले तर एक मोटारसायकल सुरू होत नाही, म्हणून चालत दोघे निघून गेले. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

Last Updated : Jan 7, 2021, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.