मीरा भाईंदर - मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन सभापती व महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी निवडणूक उद्या पार पडणार आहे. परिवहन समिती सभापती व महिला बालकल्याण सभापती, उपसभापतीसाठी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
भाजपा विरुद्ध सेना काँग्रेसचे उमेदवार
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सभापतीपदासाठी सेनेकडून राजेश म्हात्रे तर भाजपाकडून दिलीप जैन यांनी अर्ज दाखल केला आहे. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी सेनेकडून तारा घरत, भाजपाकडून वंदना पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. महिला बालकल्याण उपसभापतीसाठी काँग्रेसकडून मर्लिन डीसा तर भाजपाकडून सुनीता भोईर यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांच्याकडे दाखल केला आहे.
भाजपा विरुद्ध सेना-काँग्रेसमध्ये लढत
मीरा भाईंदर महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. तसेच शहरातील सर्व प्रभाग समितीवर भाजपाचे सभापती आहेत. इतर समित्यादेखील भाजपाच्या ताब्यात आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यात परिवहन सभापती,तर फेब्रुवारी महिन्यात महिला व बालकल्याण सभापतीपदाची मुदत संपुष्टात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रार्दुभावमुळे सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. भाजपाविरुद्ध सेना-काँग्रेस अशी लढत आहे. परंतु भाजपाची एकहाती सत्ता असल्यामुळे कोणाच्या बाजुने निर्णय येणार, याची उत्सुकता आहे.