ETV Bharat / city

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ववत बसवा; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र - एकनाथ शिंदेंची बेळगावातील शिवाजी पुतळ्यावर प्रतिक्रिया

'बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये पूर्व परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, काही लोकांनी सूड बुद्धीने रात्रीच्या अंधारामध्ये तो पुतळा हटविण्याचे पाप केले आहे. त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो'. अशा शब्दात मंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Aug 9, 2020, 2:43 PM IST

Updated : Aug 9, 2020, 4:26 PM IST

ठाणे - बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ववत बसवा, या मागणीचे पत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर असून कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील याचा गांभीर्यानं विचार करतील, असा आशावाद देखील शिंदे यांनी व्यक्त केला.

यासंदर्भात माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये पूर्व परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, काही लोकांनी सूड बुद्धीने रात्रीच्या अंधारामध्ये तो पुतळा हटविण्याचे पाप केले आहे. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. संपूर्ण देशाचे दैवत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ववत सन्मानपूर्वक या ठिकाणी बसवण्याची मागणी समन्वयक मंत्री मी व छगन भुजबळ साहेब यांच्या वतीने करण्यात आली आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, याची गंभीर दखल कर्नाटकचे मुख्यमंत्री घेतीलच, सोबतच ही बाब महाराष्ट्र्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील गांभीर्याने घेतलेली आहे. यामुळे हा विषय लवकरच निकालात निघेल, अशा आशावाद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - बेळगाव : शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात हटवला; गावात तणावाचे वातावरण

Last Updated : Aug 9, 2020, 4:26 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.