ETV Bharat / city

Shiv Sena: शिवसेनेच्या विभागणीमुळे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा उस्ताह ओसरला

author img

By

Published : Jul 25, 2022, 7:41 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाण्यात दरवर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्सहात साजरा होतो. मात्र, शिंदे यांच्या बंडानंतर उत्साह कुठेही पाहायला मिळथ नाही.

बॅनर
बॅनर

ठाणे - करोडो रुपयांच्या जाहिराती आणि करोडो रुपयांचे होर्डिंग असा इतिहास असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांचा वाढदिवस ठाण्यातील रस्त्यांवर कुठेही पाहायला मिळत नाही. कारण दरवर्षी होणारा करोड रुपयांचा खर्च यावर्षी शिवसेना पक्षातील बंडखोरीमुळे झालेला दिसत नाही. यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे पोस्टर कुठेही पाहायला मिळत नाही. खासदार राजन विचारे यांनी लावलेला एकमेव पोस्टर हा ठाण्यात आता चर्चेचा विषय झाला आहे.

संघर्षाचा ठाण्यात वेगळा परिणाम - सत्तांतरानंतर महाराष्ट्रात प्रामुख्याने शिवसेनेचे दोन गट पाहायला मिळत आहेत. एक म्हणजे उद्धव ठाकरे गट व दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट. परंतु, या संघर्षाचा ठाण्यात वेगळा परिणाम देखील दिसून येत आहे. तर, उद्धव ठाकरे यांच्यावरील ठाण्यातील शिवसैनिकांचे प्रेम कमी झाले आहे काय? असा सवाल उद्भवत आहे.

वाढदिवसाचा फक्त एकच बॅनर - शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात महाराष्ट्रभर साजरा केला जातो. त्यातच ठाणे शहरात देखील मोठ-मोठे होर्डिंग व मोठ-मोठे बॅनर लावून शिवसेनाप्रमुखांना शुभेच्छा दिल्या जातात. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देखील उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. परंतु, यावर्षी राजकीय चित्र पाहिले तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा फक्त एकच बॅनर ठाणे शहरातील मध्यवर्ती असलेल्या मासुंदा तलावाच्या इथे पाहायला मिळत आहे.

शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी आपले समर्थन दर्शवले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला प्रामुख्याने ठाणे शहरातील असंख्य शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी आपले समर्थन दर्शवले आहे. परंतु, ठाण्यातील खासदार राजन विचारे व त्यांच्याकडील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत या आधी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस (27 जुलै)ला असून त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर देखील लावलेले आहेत. परंतु, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जात होता त्याच ठिकाणी आता मात्र एकाच बॅनर मार्फत शुभेच्छा दिल्या आहेत.

एका महिन्यात एवढा बदल - राजकीय क्षेत्रात गेले एक महिना मोठ्या घडामोडी दिसून येत असताना मुख्यमंत्री ठाण्याचे असूनही राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवला नाही. परंतु, त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांना मात्र शुभेच्छा देत व भेटी घेत राजन विचारे यांनी माध्यमांसमोर न बोलता आपले मत व्यक्त केलेले दिसत आहे. एकेकाळी मातोश्री व ठाकरे परिवार शिवसैनिकांसाठी पंढरी व पांडुरंग मानले जात असताना आताच बदललेलं राजकीय चित्र पाहून येत्या काळात शिवसैनिकांना शिवसेनेतील ठाकरे आठवतील की नाही हा मोठा पेच उदभवण्याचे संकेत दिसून येत आहेत.

हेही वाचा - Breaking : गुजरातमध्ये धक्कादायक घटना: बेकादेशीर दारु पिल्याने 8 जणांचा मृत्यू!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.