ETV Bharat / city

Dispute in Shivsena and NCP Corporators : राज्यात सत्तेत एकत्र असलेले ठाण्यात शिवसेना अन् राष्ट्रवादीचे नगरसेवक भिडले - MLA Naresh Mhaske

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित सत्तेत असताना ठाण्यात मात्र शिवसेना व राष्ट्रवादी कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच एकमेकांच्या विरोधात असताना पाहायला मिळत आहे. बुधवारीही ( दि. 29 ) ठाणे महानगर पालिकेच्या ( Thane Corporation ) सर्वसाधारण महासभेत शिवसेना व राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडताना पाहायला ( Dispute in Shivsena and NCP Corporators ) मिळाले. ठाणे महापालिकेत बहुमत असल्यामुळे शिवसेनेला आगामी पालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाच्या मदतीची गरज नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत एकत्रित असलेले राष्ट्रवादी शिवसेना ठाणे महापालिकेत एकत्रित राहतील का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Dec 29, 2021, 3:30 PM IST

ठाणे - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित सत्तेत असताना ठाण्यात मात्र शिवसेना व राष्ट्रवादी कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच एकमेकांच्या विरोधात असताना पाहायला मिळत आहे. बुधवारीही ( दि. 29 ) ठाणे महानगर पालिकेच्या ( Thane Corporation ) सर्वसाधारण महासभेत शिवसेना व राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडताना पाहायला ( Dispute in Shivsena and NCP Corporators ) मिळाले.

सेना राष्ट्रवादी नगरसेवकांचा राडा

ठाणे महानगरपालिकेच्या ( Thane Corporation ) आज सुरू असलेल्या महासभेत महापालिका विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास कामे होत नसल्याच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, महापालिका विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण यांनी महासभा सुरू असताना मुंब्रा भागात सुरू असलेल्या पाणी प्रश्नावर महापौर नरेश म्हस्के ( MLA Naresh Mhaske ) यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. सत्ताधारी शिवसेना आणि महापालिका प्रशासन नेहमीच आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते तसेच आमच्या प्रभागातील विकासकामे होऊ देत नाहीत, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हे आंदोलन केले. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी अशरफ शानु पठाण यांना धक्के मारत सभागृहाच्या बाहेर काढले. महासभेत 20 मिनिट सत्ताधारी आणि विरोधक, असा मोठा गोंधळ यावेळी पाहायला मिळाला. आजच्या या गोंधळामुळे राज्यातील महाविकास आघाडीत मांडीला मांडी लावून सत्तेत असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी ठाण्यात मात्र एकमेकांच्या विरोधात असलेली पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी-शिवसेना ठाणे महापालिकेत एकत्रित राहतील का

मागील अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पण, शिवसेनेचे राष्ट्रवादीसोबत सोबत जमलेले नाही. त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हे चित्र पाहायला मिळणार आहे. ठाणे महापालिकेत बहुमत असल्यामुळे शिवसेनेला कोणत्याही पक्षाच्या मदतीची गरज नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत एकत्रित असलेले राष्ट्रवादी-शिवसेना ठाणे महापालिकेत एकत्रित राहतील का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

हेही वाचा - Corona in Thane : नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन! कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल विभागाच्या 50 टीम तयार, पार्ट्यांवर निर्बंध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.