ठाणे - राज्यात गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असलेल्या दोन पक्षांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात मंगळवारी (दि. 17 ऑगस्ट) खडाजंगी पहायला मिळाली. ठाणे महानगरपालिकेची महासभा दृकश्राव्य माध्यमातून होत असताना आम्हाला बोलू दिले जात नाही आणि आमचा आवाज म्यूट केला जातो, असा आरोप करत ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी थेट पालिका सभागृहात धडक दिली. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि सत्ताधारी शिवसेनेतील सर्व नेत्यांना धारेवर धरले.
लस वाटपात केला जातोय भेदवाव
कोरोना वॅक्सीन वाटपाबाबत भेदभाव केला जात आहे. सत्ताधारी शिवेनेच्या प्रभागामध्येच या गाड्या फिरवल्या जातात तर राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रभागात लसींचा पुरवठा केलाच जात नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. बजेट आणि इतर मुद्द्यावर चर्चा करणे तर दूरच केवळ प्रश्न विचारला तरी आवाज म्यूट केला जातो त्यामुळेच आम्हाला इथे यावे लागले, असे अश्रफ शानू पठाण म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी सेना राष्ट्रवादी एकत्र असली तरी ठाण्यात मात्र शिवसेना विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे चित्र ठाणे महापालिकेत पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - लसीकरणाच्या मुद्यावर शर्मिला ठाकरेंची केंद्र व राज्य सरकारवर टीका, म्हणाल्या...