ठाणे - निसर्ग चक्रीवादळामुळे झालेला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच पावसाचे पाणी भूमिगत गटारातून वाहून जात नसल्याने काही भागात तळ्यांच्या स्वरूपात पाणी साठल्याचे दिसत आहे. सध्या गटारांतून काढलेला कचरा रस्त्याच्या दुतर्फा ढिगाच्या स्वरूपात ठेवण्यात आला आहे. त्याुमळे पाण्याचा निचरा न झाल्यास हाच कचरा सडून इथे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... निसर्ग चक्रीवादळ : मुंबईत ३७ ठिकाणी झाडांची पडझड, तर 10 हजार 840 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
कल्याण वीज वितरण कंपनीच्या हद्दीत उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे विजवाहक यंत्रणेवर पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटर बसवण्यात आले होते. मात्र, पहिलल्याच पावसाचे पाणी पडताच ते पंक्चर होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. याशिवाय झाडाच्या फांद्या विजवाहक तारांवर पडल्याने आणि विजवाहक तारा तुटल्याने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला.
कल्याण मंडळ एक मध्ये येणाऱ्या कल्याण पश्चिममधील बारावे, रामबाग, शिवाजी चौक, रहेजा कॉम्प्लेक्स, कल्याण पूर्वमधील वालधुनी, ठाकुर्ली, काटेमानिवली, चिंचपाडा, डोंबिवलीतील कोपर रोड, नांदीवली, आजदे, नवापाडा भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुधवारी दुपारी तेजश्री फीडर बंद ठेवण्यात आला होता. कल्याण मंडळ दोनमध्ये येणाऱ्या बदलापूर, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ या ठिकाणीही वीजपुरवठा खंडित झाला होता.
हेही वाचा... क्रुरतेचा कळस..! गर्भवती हत्तीणीला पेटती स्फोटके खायला देऊन हत्या, केरळमधील घटना
मंगळवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसात वीज पुरवठ्यातील त्रुटी शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी आणि कंत्राटदाराचे कामगार अहोरात्र काम करत आहेत. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्यासह अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते स्वतः फिल्डवर आहेत. नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन विजेचे नवीन खांब, केबल व अत्यावश्यक साहित्य तयार ठेवण्यात आले आहे. आपत्तीच्या काळात महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
डोंबिवली पूर्वेकडे स्टेशन परिसरात पावसामुळे साचलेले पाणी भूमिगत गटाराूनत वाहून जात नाही. त्यामुळे या भागाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच गटारातून काढलेला कचरा रस्त्याच्या दुतर्फा ढिगाच्या स्वरूपात ठेवण्यात आला आहे. या पाण्याचा निचरा न झाल्यास हाच कचरा सडून या भागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे.