ETV Bharat / city

...तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांना घेराव घालणार -देवेंद्र फडणवीस

भाजप कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर २८ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास दुकानात असताना दोन हल्लेखोरांनी ( Attack on Manoj Katake ) डोळ्यात मिरची फूड टाकून जीवघेणा केला. चार दिवसांनी फडवणीस यांनी जखमी मनोजची भेट घेत प्रकृतीची ( Devendra Fadnavis meet Manoj Katake ) माहिती घेतली. यावेळी फडवणीस म्हणाले, की भाजप कार्यकर्ता मनोज झालेल्या हल्ल्याच्या जखमा पाहून तो जीवघेणाच होता.

author img

By

Published : Mar 4, 2022, 10:27 PM IST

Updated : Mar 4, 2022, 11:00 PM IST

मनोज कटके यांची घेतली भेट
मनोज कटके यांची घेतली भेट

ठाणे - डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्तेवर झालेला हल्ला ( Attack on BJP partyworker in Dombivali ) जीवघेणा आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. अधिवेशन संपताच डोंबीवलीच्या पोलीस ठाण्यावर महामोर्चा काढण्यात ( Devendra Fadnavis warn Morcha ) येईल. मी स्वतः नेतृत्व करून पोलिसांना घेराव घालणार असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस म्हणाले, की भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यात आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असेल हे योग्य नाही.

ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांना घेराव घालणार

हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत-

भाजप कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर २८ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास दुकानात असताना दोन हल्लेखोरांनी ( Attack on Manoj Katake ) डोळ्यात मिरची फूड टाकून जीवघेणा केला. चार दिवसांनी फडवणीस यांनी जखमी मनोजची भेट घेत प्रकृतीची ( Devendra Fadnavis meet Manoj Katake ) माहिती घेतली. यावेळी फडवणीस म्हणाले, की भाजप कार्यकर्ता मनोज झालेल्या हल्ल्याच्या जखमा पाहून तो जीवघेणाच होता. या हल्ल्यातून वाचला असला तरी अशा घटना यापुढे होता कामा नये. याची पोलिसांनी नोंद घ्यावी म्हणून मी डोंबिवलीत आलो आहे. या हल्ल्यामागे सूत्रधार जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत पोलिसांनी पोहोचावे. अन्यथा असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत.

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

आमदार चव्हाण यांनी कटके यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडे माहिती घेतली. कटके यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. याबाबत आमदार चव्हाण म्हणाले, भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करत असून, पोलिसांनी लवकरात लवकर हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. तर, कल्याण पोलीस परीमंडळचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना विचारले असता, हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हल्ला नेमका कुठल्या उद्देशाने करण्यात आला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून हल्लेखोरांच्या अटकेनंतरच सत्य समोर येणार असल्याचे सांगण्यात आले.

Last Updated : Mar 4, 2022, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.