ETV Bharat / city

Corona : ठाण्यात दिलासादायक चित्र.. रुग्णसंख्येत घट, बेडही होऊ लागले उपलब्ध - ठाणे कोरोना अपडेट

ठाणे शहरातील कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १८८ दिवसांवर गेला असून सुमारे ६१ टक्के बेड ठाण्यातील रुग्णांसाठी उपलब्ध असल्याने बेड न मिळण्याची चिंता मिटली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे.

thane corona update
thane corona update
author img

By

Published : May 11, 2021, 7:33 PM IST

ठाणे - शहरातील कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १८८ दिवसांवर गेला असून सुमारे ६१ टक्के बेड ठाण्यातील रुग्णांसाठी उपलब्ध असल्याने बेड न मिळण्याची चिंता मिटली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. त्यामुळे ठाणे शहरात वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिका स्तरावर उपाययोजना सुरू आहेत.

मागील महिनाभर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे रूग्ण दुप्पट होण्याचा वेगही वाढला होता. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी एक ते दोन दिवसांवर आला होता परंतु मागील १५ दिवस रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. ८३ टक्क्यांवरून हे प्रमाण एका महिन्यात ९३.८ टक्क्यांवर पोहचले आहे. तर पाॅझिटिव्ह रूग्ण सापडण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. १८०० ते २००० दरम्यान मिळणारी रूग्ण संख्या ४०० वर आली आहे. त्यामुळे रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण देखील वाढून १८८ दिवसांवर पोहचले आहे.

ठाण्यात कोरोना रुग्णसंख्येत घट
ठाणे शहरात आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 1,24,511 इतकी आहे. आजपर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 1,17,143 इतके रुग्ण आहेत. बरे होण्याचे प्रमाण 94.1 टक्के आहे. 5, 592 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 1,776 जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील आठवडाभरातील आकडे -

तारीखकोरोनाबाधित संख्याबरे झालेले रुग्णांची संख्यामृत्यू
4-5-20215521093 09
5-5-2021 715104410
6-5-202160169208
7-5-2021 445 76110
8-5-2021 47996109
9-5-2021406 853 07
10-5-202138868807

कोरोना रुग्णसंख्या घट होण्यामागची महत्वाची कारणे -

1) राज्य शासनाकडून लावणयात आलेले कडक निर्बंध
2) लसीकरणामुळे प्रादूर्भाव कमी झाला तर अँटीजेन टेस्ट आणि RT-PCR चाचणीमुळे रुग्णांची आकडेवारी समोर आली.
3) कडक निर्बंधामुळे बाजारपेठ असो वा भाजीमंडई यांंना दिलेल्या कमी वेळामुळे गर्दी प्रमाण कमी झाले.
4) सोशल डिस्टन्स आणि मास्कबाबत पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून होणारी कारवाईमुळे नागरिक सतर्क झाले व नियम पाळायला लागले.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने बेड साठी होणारी वणवण कमी होत आहे.

बेड मिळू लागल्य़ाने दिलासादायक चित्र -

महापालिका हद्दीतील खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयात पाच हजार २३१ बेड आहेत. त्यामध्ये सामान्य बेडची संख्या १४४५ इतकी असून त्यापैकी अवघे ३६३ बेड रूग्ण वापरत असून १०८२ बेड खाली आहेत. प्राणवायूची सुविधा असलेले दोन हजार ७६५ बेड असून १०६३ बेड फुल्ल आहेत तर एक हजार ७०२ बेड रुग्णांकरिता उपलब्ध आहेत. अतिदक्षता विभागात १०२१ बेड आहेत. त्यापैकी ६१२ बेड फुल्ल असून ४०९ बेड रुग्णाच्या प्रतीक्षेत आहेत. व्हेंटिलेटरवर १९९ रूग्ण असून १५१ बेड विविध रुग्णालयात रुग्णांकरिता उपलब्ध आहेत. त्यामुळे बेड मिळत नाही किंवा व्हेंटिलटर उपलब्ध नाही अशी परिस्थितीठाण्यात सध्या नाही आहे त्यामुळे महापालिका प्रशासन निश्चिंत झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.