ETV Bharat / city

धक्कादायक ! मोटारमनला फक्त शीर दिसले रुळावर - railway track

चेन्नई एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने जात असताना मोटरमनला रुळावर एक शीर दिसले. त्यांनी या घटनेची माहिती त्वरित बदलापूर रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ते अनोळखी व्यक्तीचे शीर ताब्यात घेतले.

शीर रेल्वे रुळावर तर धड रुळाखालील नाल्यात, ठाण्यातील घटना
author img

By

Published : Jul 25, 2019, 6:47 PM IST

ठाणे - बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील अप रेल्वेमार्गावर एका व्यक्तीचे मुंडके रेल्वे रुळावर पडलेले मीळाले, तर त्या व्यक्तीचे धड नाल्यात सापडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

चेन्नई एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने जात असताना मोटरमनला रुळावर एक शीर दिसले. त्यांनी या घटनेची खबर त्वरित बदलापूर रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ते अनोळखी व्यक्तीचे शीर ताब्यात घेतले. मात्र, घटनास्थळी त्या व्यक्तीचे धड सापडले नव्हते. एकंदरीतच हा रेल्वे अपघाताचा प्रकार आहे की कोणी त्याला ठार मारून त्याचे शीर रेल्वे रुळावर आणून टाकले आहे का? असा प्रश्न पोलिसांना पडला होता. ज्या ठिकाणी शीर आढळून आले, त्या ठिकाणी रेल्वे रुळाखाली नाला असल्यामुळे कदाचित लोकल गाडीच्या धडकेत त्याचे धड नाल्यात पडून शीर रेल्वे रुळावर राहिले असावे असा अंदाज पोलिसांनी लावला, आणि नाल्यात धडाचा शोध घेण्याचे ठरवले. मुसळधार पाऊस असल्यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाहता असल्याने धड दिसत नव्हते. यामुळे रेल्वे पोलिसांनी बदलापूर अग्निशामक दलाच्या जवानांना या घटनेची खबर देऊन घटनास्थळी बोलावले.

अग्निशामक दलाचे फायर ऑफिसर भागवत सोनवणे, लेडींग फायरमन प्रदीप जाधव मदतनीस दिलीप गवळी, बळीराम बोराडे, गणेश धुळे या अग्निशामक दलाच्या जवानांनी नाल्यामध्ये शोध घेऊन अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर नाल्यातील एका कोपर्‍यात अडकलेल्या धडाला त्या ठिकाणाहून बाहेर काढले. हा मृतदेह तीस ते पस्तीस वयोगटातील व्यक्तीचे असून त्याची ओळख पटली नव्हती. दरम्यान त्याने आत्महत्या केली आहे, की धावत्या गाडी खाली सापडून त्याचा मृत्यू झाला आहे. याचे कारण अद्याप पोलिसांना समजलेले नाही अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:मुंडके रेल्वे रुळावर तर धड रुळाखालील नाल्यात

ठाणे :- बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील अप रेल्वेमार्गावर एका इसमाचे मुंडके रेल्वे रुळावर पडलेले . तर त्याचे धड नाल्यात सापडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर अप रेल्वेमार्गावरील रुळावर एका इसमाचे मुंडके दुपारच्या सुमारास पडलेले होते, त्यावेळी चेन्नई एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने जात असताना मोटरमनला रुळावरील ते मुंडके दिसल्याने त्यांनी या घटनेची खबर त्वरित बदलापूर रेल्वे पोलिसांना दिली, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ते अनोखे इसमाचे मुंडके ताब्यात घेतले, मात्र घटनास्थळी त्या इसमाचे धड सापडले नव्हते, एकंदरीतच हा रेल्वे अपघाताचा प्रकार आहे की कोणी त्याला ठार मारून त्याचे मुंडके रेल्वे रुळावर आणून टाकले आहे का? असा प्रश्न पोलिसांना पडला होता. ज्या ठिकाणी मुंडके आढळून आले त्या ठिकाणी रेल्वे रुळाखाली नाला असल्यामुळे कदाचित लोकल गाडीच्या धडकेत त्याचे धड नाल्यात पडून मुंडके रेल्वे रुळावर राहिले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवून नाल्यात धडा चा शोध घेण्याचे ठरवले. मुसळधार पाऊस असल्यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने धड दिसून येत नव्हते त्यामुळे रेल्वे पोलिसांनी बदलापूर अग्निशामक दलाच्या जवानांना या घटनेची खबर देऊन घटनास्थळी बोलावले, अग्निशामक दलाचे फायर ऑफिसर भागवत सोनवणे ,लेडींग फायरमन प्रदीप जाधव मदतनीस दिलीप गवळी ,बळीराम बोराडे, गणेश धुळे या अग्निशामक दला च्या जवानांनी नाल्यामध्ये शोध घेऊन अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर नाल्यातील एका कोपर्‍यात अडकलेल्या धडाला त्या ठिकाणाहून बाहेर काढले . हा मृतदेह तीस ते पस्तीस वयोगटाच्या इसमाचे असून त्याची ओळख पटली नव्हती. दरम्यान त्याने आत्महत्या केली आहे की धावत्या गाडी खाली सापडून त्याचा मृत्यू झाला आहे याचे कारण अद्याप पोलिसांना समजले नाही अधिक तपास पोलीस करीत आहेत,
ftp fid (2, photo)
mh_tha_1_rel_accident_2_photo_10007

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.