ETV Bharat / city

#Cylinder man : गॅसवाला कसा बनला "सिलिंडर मॅन"? जाणून घ्या... - सागर जाधव सिलेंडर मॅन

सागर जाधव गॅस सिलिंडर वितरणाचे काम करतो. हे काम करत असताना काही दिवसांपूर्वी तो सिलिंडरच्या टेम्पोला खेटून उभा होता. पिळदार शरीरयष्टीमुळे लगेचच लक्ष वेधून घेणाऱ्या सागरला तुषार भामरे यांनी पाहिले. यावेळी त्यांनी त्याच्या नकळत त्याचा फोटो काढून तो फेसबूकवर शेअर केला. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी सागरला "सिलिंडर मॅन"(#Cylinder man) हे नाव दिले.

गॅसवाला कसा बनला "सिलिंडर मॅन"? जाणून घ्या...

author img

By

Published : Jun 30, 2021, 5:21 PM IST

ठाणे : सोशल मीडियातून प्रसिद्धी मिळून रातोरात स्टार झाल्याची अनेक उदाहरणे अलिकडच्या काळात समोर आली आहे. अंबरनाथमधील एक तरूणही अशाच पद्धतीने रात्रीतून स्टार झाला असून "सिलिंडर मॅन" अशी नवी ओळख त्याला मिळाली आहे. सागर जाधव असे या "सिलिंडर मॅन"चे नाव आहे. गॅस सिलिंडर वितरणाचे काम करणाऱ्या पिळदार शरीरयष्टीच्या सागरचा एक फोटो एका युझरने फेसबूकवर टाकला आणि हा फोटो लगेचच व्हायरल होऊन सागर "सिलिंडर मॅन" म्हणून ओळखला जाऊ लागला.

गॅसवाला कसा बनला "सिलिंडर मॅन"?

फोटो व्हायरल झाल्याने मिळाली प्रसिद्धी

अंबरनाथ शहरातील लक्ष्मी नगर परिसरात राहणारा सागर जाधव गॅस सिलिंडर वितरणाचे काम करतो. हे काम करत असताना काही दिवसांपूर्वी तो सिलिंडरच्या टेम्पोला खेटून उभा होता. पिळदार शरीरयष्टीमुळे लगेचच लक्ष वेधून घेणाऱ्या सागरला तुषार भामरे यांनी पाहिले. यावेळी त्यांनी त्याच्या नकळत त्याचा फोटो काढून तो फेसबूकवर शेअर केला. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी सागरला "सिलिंडर मॅन" हे नाव दिले.

12 वर्षांपासून सिलिंडर वितरणाचे काम
अंबरनाथमधील लक्ष्मीनगर परिसरातच असलेल्या भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये सागर कामाला आहे. गेल्या 12 वर्षांपासून तो इथे नोकरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवतो. विशेष म्हणजे यापूर्वी तो आजच्यासारखा बॉडी बिल्डर नव्हता. पूर्वी त्याची शरीरयष्टी अतिशय सडपातळ होती. सिलिंडर उचलण्याचे काम अतिशय मेहनतीचे असल्याने यासाठी शरीरयष्टी कमावण्याचा निर्णय सागरने घेतला आणि पाच वर्षांपूर्वी त्याने एक जीम जॉईन केली. जीममध्ये सातत्यपूर्ण मेहनत करून त्याने भारदस्त देहयष्टी कमावली. यामुळे एखाद्या मॉडेलप्रमाणेच तो दिसायला लागला.

नामांकित व्यक्तींकडूनही सागरचे कौतुक
फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून सागरवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सामान्य नेटकऱ्यांपासून अनेक नामांकित व्यक्तींनीही त्याचे कौतुक केले आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंपासून ते प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिकेनेही सागरच्या फोटोची दखल घेत त्याला कौतुकाची थाप दिली. त्यामुळेच काल परवापर्यंत गॅसवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागरला आज अनेक जण "सिलिंडर मॅन" म्हणून ओळखू लागले आहेत.

सीरियल, वेब सीरिजमध्ये काम मिळाल्यास निश्चित करेन
एका रात्रीत सेलिब्रिटी बनलेल्या सागरची लोकप्रियता आता चांगलीच वाढली आहे. सागर आता जिथे सिलिंडरची डिलिव्हरी द्यायला जातो तिथले लोकही उत्सुकतेनं आपल्याकडे पाहात असल्याचं सागर सांगतो. त्याच्या सहकाऱ्यांनाही त्याच मोठं कौतुक आहे. सागरनं खूप पुढे जावं आणि नाव कमवावं असं त्याच्या मित्रांना वाटतं. सागर याबद्दल नम्रतेने सर्वांचेच आभार मानत आहे. तसंच एखाद्या सीरियल किंवा वेब सीरिजमध्ये काम मिळाल्यास निश्चित करेन असेही त्याने म्हटले आहे.

हेही वाचा - ऐकावं ते नवलंच! गुजरातच्या पोलीस ठाण्यात 2 भूतांविरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.