ETV Bharat / city

सायबर सुरक्षा ही काळाची गरज; ठाणे पोलिसांकडून कार्यशाळेद्वारे जनजागृती

इंटरनेटरुपी घोड्यावर स्वार होऊन 'जागतिकीकरणाच्या' दिशेने जाणाऱ्या नागरिकांना सावध व सतर्क करण्यासाठी ठाणे पोलिसांनी सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळेचे आयोजन केले होते.

सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळा
author img

By

Published : Aug 31, 2019, 10:34 PM IST

ठाणे - इंटरनेटचे विश्व खूप मोठे आहे. सध्या सायबर गुन्हे हा वेगाने वाढणारा विषय असून ‘हॅकिंग’ सारख्या गंभीर समस्या समोर येत आहेत. दरम्यान, हा प्रकार इंटरनेटच्या माध्यमातूनच सुरू आहे. त्यामुळे वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षाही धोक्यात आली असून अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या संदर्भात ठाणे पोलिसांनी सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळा आयोजित करुन जनजागृती घडवून आणली आहे.

सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळा

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच त्याद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आणि त्यामध्ये इंटरनेट असणे ही बाब आता आवश्यक झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना सोशल मीडियाच्या वापराचे धोकेही पूर्णत: माहीत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करून त्रास ओढवून घेतल्याच्या घटनाही वाढत आहेत. अनेक तरुण-तरुणी कमी वय असूनही खोटी माहिती देऊन सोशल मीडियावर खाते उघडतात. त्यामुळे ते अगदी सहज ‘सायबर गुन्हेगारांच्या’ जाळ्यात सापडत आहेत. सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करणे, फेसबुक, व्हॉट्स अ‌ॅपवरून अश्लील संदेश पाठविणे, मुलींच्या फोटोंचा गैरवापर करणे, समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकणे, बदनामीकारक मजकूर किंवा फोटो पोस्ट करणे, फेसुबकचे अकाऊंट हॅक करून खंडणी उकळणे यांची संख्या जास्त आहे.

सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती नसल्याचा फटका अनेक तरुणींना बसला आहे. ‘व्हॉट्स अ‌ॅप’वरील ‘डीपी’ अनोळखी व्यक्तीला दिसू नयेत, यासाठी विशिष्ट ‘सेटिंग’ असते. मात्र, याची माहिती अनेकांना नाही. अनेकदा आरोपी मुलीच्या नावे बनावट अकाउंट तयार करून इतर मुलींशी संपर्क साधतात. त्यामुळे तरुणींनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो, वैयक्तिक माहिती शेअर करु नये. सोशल मीडियाचा वापर करण्यात १५ ते २० वर्षे वयाची मुले आघाडीवर आहेत. त्यामुळे पालकांनी मुले जास्त वेळ कशावर घालवतात, यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपनी कडून आलेल्या ई-मेल वर क्लिक करु नका अथवा त्यांना कोणत्याही संवेदनशील माहिती पुरवू नका, आपला ई-मेल आयडी हा पासवर्ड सोबत ब्राऊजर वर AUTO - SAVE करणे टाळा , मोबाइल स्मार्ट फोन ला देखील पासवर्ड ठेवा, बँक संदर्भातील किंवा इतर महत्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करु नका, असे त्यांनी स्पष्ट केले.

Intro:सायबर सुरक्षा ही काळाची गरज सोशल मीडिया हे पोलिसांपुढे मोठे आव्हानBody:इंटरनेटचे विश्व खूप मोठे आहे. सध्या सायबर क्राइम हा वेगाने वाढणारा विषय असून ‘हॅकिंग ’ ’सारख्या गंभीर अशी समस्या आहे व ही इंटरनेटच्या माध्यमातूनच सुरू आहे. हे तर सर्वाना माहीतच आहे त्यामुळे वाढत्या सायबर क्राइममुळे राष्ट्रीय सुरक्षाही धोक्यात आली आहे, अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच त्याद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आणि त्यामध्ये इंटरनेट असणे ही बाब आता आवश्यक झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना सोशल मीडियाच्या वापराचे धोकेही पूर्णत: माहीत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करून त्रास ओढवून घेतल्याच्या घटनांही वाढत आहेत. अनेक तरुण-तरुणी कमी वय असूनही खोटी माहिती देऊन सोशल मीडियावर प्रोफाइल उघडत आहेत. त्यामुळे ते अगदी सहज ‘सायबर गुन्हेगारांच्या’ जाळ्यात सापडत आहेत. सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करणे, फेसबुक, व्हॉट्स अॅपवरून अश्लील संदेश पाठविणे, मुलींच्या फोटोंचा गैरवापर करणे, समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकणे, बदनामीकारक मजकूर किंवा फोटो पोस्ट करणे, फेसुबकचे अकाऊंट हॅक करून खंडणी उकळणे यांची संख्या जास्त आहे. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती नसल्याचा फटका अनेक तरुणींना बसला आहे. ‘व्हॉट्स अॅप’वरील ‘डीपी’ अनोळखी व्यक्तीला दिसू नयेत, यासाठी विशिष्ट ‘सेटिंग’ असते. मात्र, याची माहिती अनेकांना नाही. अनेकदा आरोपी मुलीच्या नावे बनावट अकाउंट तयार करून इतर मुलींशी संपर्क साधतात. त्यामुळे तरुणींनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो, वैयक्तिक माहिती शेअर करू नये. सोशल मीडियाचा वापर करण्यात १५ ते २० वर्षे वयाची मुले आघाडीवर आहेत. त्यामुळे पालकांनी मुले जास्त वेळ कशावर घालवतात, यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपनी कडून आलेल्या ई-मेल वर क्लिक करु नका अथवा त्यांना कोणत्याही संवेदनशील माहिती पुरवू नका , आपला ई-मेल आयडी हा पासवर्ड सोबत ब्राऊजर वर AUTO - SAVE करणे टाळा , मोबाइल स्मार्ट फोन ला देखील पासवर्ड ठेवा , बँक संदर्भातील किंवा इतर महत्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करू नका , असे त्यांनी स्पष्ट केले.

BYTE :- संजय जाधव ( उपायुक्त - आर्थिक गुन्हे शाखा ठाणे )
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.