ETV Bharat / city

सायकलसाठी जमा केलेले पैसे 'त्याने' दिले महापौर निधीला, वाढदिवसाला समाजकार्य

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पनवेलमधील एका मुलाने त्याच्या पंधराव्या वाढदिवसानिमित्त आपल्या पिगी बँकमध्ये सायकलसाठी जमा केलेले पाच हजार नऊशे रुपये पनवेल महापालिकेच्या महापौर निधीत जमा केले.

boy donated his savings to Panvel Mayor Relief Fund
पंधरा वर्षीय फकीर चांद शेखने आपली बचत राशी महापौर निधीत केली जमा
author img

By

Published : Jun 9, 2020, 6:47 PM IST

नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पनवेलमधील एका मुलाने त्याच्या पंधराव्या वाढदिवसानिमित्त आपल्या पिगी बँकमध्ये जमा झालेले पाच हजार नऊशे रुपये पनवेल महापालिकेच्या महापौर निधीत जमा केले आहे. त्याच्या या कृतीतून त्याने समाजाप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फकीर चांद शेख असे या मुलाचे नाव असून त्याने सायकलसाठी हे पैसे जमा केले होते. पनवेल महानगरपालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे त्याने है पैसे जमा केले आहे. यावेळी लेंगरेकर यांनी त्याच्या कृतीचे कौतुक केले.

पंधरा वर्षीय फकीर चांद शेखने आपली बचत राशी महापौर निधीत केली जमा....

हेही वाचा... कीटकनाशकांवरील बंदीवर आंबा बागायतदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया

कोरोना विषाणूचे थैमान दिवसेंदिवस रुद्र स्वरूप धारण करीत आहे. पनवेल महापालिकेसह पनवेल तालुका सुद्धा रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. विषाणू संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी कोविड योद्धे लढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पनवेल महापलिकेच्या आयुक्तांनी महापौर सहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे.

फकीर चांद शेखने केले पिगी बँकेतील पैसे जमा...

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने साधत पिगी बँकमध्ये साठवलेली रक्कम, महापौर सहाय्यता निधीसाठी देण्याची इच्छा पनवेलमधील फकीर चांद शेख याने आईवडिलांकडे व्यक्त केली. फकीर चांद शेखच्या इच्छेला आईवडिलांनीही पाठिंबा दिला. त्यानुसार त्याने आपली पिगी बँक पनवेल महानगर पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे महापौर सहायत्ता निधीसाठी दिली. ही पिगी बँक फोडली असता, त्यात 5,967 रुपये जमा झाले होते. इतक्या लहान वयात समाजाप्रती असलेले कर्तव्य जपल्याचे एक चांगले उदाहरण फकिर चांद शेखने समाजासमोर ठेवले आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.