ETV Bharat / city

ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागात 82 हजार 532 नागरिकांना लसीचा पहिला डोस - Thane vaccination

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आज (शनिवार) अखेर 82 हजार 532 नागरिकांना पहिला कोरोना लसीचा डोस तर 12 हजार 147 नागरिकांना दुसरा देण्यात आला आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी दिली.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Apr 10, 2021, 8:45 PM IST

ठाणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आज (शनिवार) अखेर 82 हजार 532 नागरिकांना पहिला कोरोना लसीचा डोस तर 12 हजार 147 नागरिकांना दुसरा देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी दिली. तसेच लाभार्थी नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सुविधा

जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर या पाच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील वांगणी, बदलापूर, सोनावळा, मांगरुळ आदी प्राथमिक केंद्र, भिवंडी तालुक्यातील पडघा, आनगाव, खारबाव, काल्हेर, दिवा अंजूर, कोन, चिंभीपाडा, वर्जेश्वरी, दाभाड इ. प्राथमिक आरोग्य केंद्र, आयजी एम उपजिल्हा रुग्णालय भिवंडी तसेच वेद हॉस्पिटल कोन, प्राणायू हॉस्पिटल कोन, राजमाता जिजाऊ हॉस्पिटल वज्रेश्वरी आदी ठिकाणी लसीकरण होत आहे. कल्याण तालुक्यातील निळजे, दहागाव, खडवली, ग्रामीण रुग्णालय गोवेली आदी केंद्रावर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. मुरबाड तालुक्यातील धसई, किशोर, म्हसा, सरळगाव, शिरोशी, शिवला, तुळई, मोरोशी, ग्रामीण रूग्णालय मुरबाड, ग्रामीण रुग्णालय टोकावडे, आदी ठिकाणी लसीकरण उपलब्ध करण्यात आली असून शहापूर तालुक्यातील अघई, डोळखांब, कसारा, शेणवा, शेंद्रून, टाकीपठार, टेभा, वाशिंद, उपजिल्हा रुग्णालय शहापूर, आदी ठिकाणी देखील लसीकरण सुविधा आहे.त्याचबरोबर साईबाबा आणि निरामय हॉस्पिटल वासिंद येथेही लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ व बदलापूर नगरपालिका हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय येथेही लसीकरण सुविधा उपलब्ध आहे.

फ्रंटलाईन वर्कर्ससह ज्येष्ठ नागरिकांना लसीचा डोस

या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 82 हजार 532 नागरिकांना पहिला डोस आणि 12 हजार 147 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यामध्ये 11 हजार 158 आरोग्य कर्मचारी आणि 9 हजार 778 फ्रंटलाइन कर्मचारी, ६० वर्षावरील 35 हजार 650 नागरिकांना, तसेच ४५ ते ६० वयोगटातील 25 हजार 946 नागरिकांना प्रथम डोस लस देण्यात आली आहे, अशी माहिती माताबाल संगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला दौरा

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी आज अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर व सोनावला प्राथमिक आरोग्य केंद्र व मुळगाव ग्रामपंचायत येथे भेट देऊन कोविड सद्यस्थिती व लसीकरण बाबत आढावा घेतला.तसेच कल्याण येथील वरप कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचायत समिती अंबरनाथ गट विकास अधिकारी शीतल कदम आणि कल्याण पंचायत समिती गट विकास अधिकारी श्वेता पालवे उपस्थित होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.