ETV Bharat / city

कर वसुली ठेकेदाराला देण्याला काँग्रेस नगरसेवकांचा विरोध; भिवंडी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन - कर वसुली ठेकदार नियुक्ती न्यूज

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. कर वसुली ठेकेदाराला देण्याच्या ठरावावरून शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहेत.

आंदोलकांचे आयुक्तांना निवेदन
आंदोलकांचे आयुक्तांना निवेदन
author img

By

Published : Dec 22, 2020, 7:07 PM IST

ठाणे - भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाला महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सुमारे २० नगरसेवकांनी विरोध करत आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली.

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. कर वसुली ठेकेदाराला देण्याच्या ठरावावरून शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहेत. विविध पक्ष संघटनांसह अनेकांनी या ठरावाला विरोध दर्शविला आहे. नगरसेवकांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन मागण्यांचे लेखी निवेदन मनपा आयुक्तांकडे दिले.

आंदोलकांचे आयुक्तांना निवेदन
आंदोलकांचे आयुक्तांना निवेदन

हेही वाचा-सदाभाऊंच्या किसान आत्मनिर्भर यात्रेविरोधात स्वाभिमानीची कडकनाथ यात्रा

जोपर्यंत हा ठराव मागे घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन
करवसुलीबाबतचा ठराव अजून माझ्यापर्यंत मंजुरीसाठी आलेला नसल्याचे मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले. हा ठराव माझ्याकडे आल्यानंतर त्यातील कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आहेत. जर हा ठराव बेकायदेशीर असेल तर त्याला आपण मंजुरी देणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे नगरसेवकांनी सांगितले. जोपर्यंत हा ठराव मागे घेत नाहीत, तोपर्यंत आपण आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नगरसेवक शोएब गुड्डू यांनी दिली आहे. या आंदोलनाप्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड, प्रदीप राका, वसीम अन्सारी , फराज बाबा, जाकीर मिर्जा, सिद्धेश्वर कामूर्ती, जुबेर अंसारी, आरिफ खान, आबू सुफियान, अरुण राऊत, नासिर खान, मोहम्मद हुसेन, साद मोमीन, इरफान वायरमन, साजिद खान, राहुल पाटील, मुजाहिद अंसारी, साजिद अंसारी व अश्रफ मुन्ना आदी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा-तुमची 'वेळ' येईल तेव्हा कर्मांचा 'हिशोब' होईल - शिवसेनेचा मोदी सरकारला 'सामना'तून इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.