ठाणे - संपूर्ण वर्षभर शाळा नाही, योग्य शिक्षण नाही, त्यात परीक्षाही नाही. त्यामुळे यंदा मुलांचे वर्ष वाया जाते की काय? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. कारण १ ते ९ आणि ११वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या वर्गात पाठवता येईल. पण १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांचे काय, असा संतप्त सवाल आता विद्यार्थी तसच पालक विचारू लागले आहेत.
'भूमिका स्पष्ट करावी'
मुलांनी प्रतिकुल परिस्थितीतही प्रयत्न करून ऑनलाइन शिक्षण घेतले. अभ्यास केला, असे असताना आता १०वी आणि १२वीची परीक्षा कधी होणार, याबाबत राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही. त्यात आता राज्य सरकार १०वी आणि १२वीच्या परीक्षा रद्द करणार आहेत, असे समजत आहे, असे सांगत ठाण्यात पालक, विद्यार्थी आणि कोचिंग क्लासेस चालकांनी संताप व्यक्त केला आहे.
'आता तर लसही उपलब्ध'
आता आपल्याकडे लस असल्याने १०वी आणि १२वीच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि शिक्षक यांचे लसीकरण करून त्यांना ऑफलाइन परीक्षा देता येईल, असे राज्य सरकारने करावे असे मत विद्यार्थी, पालक आणि कोचिंग क्लासचालक करत आहेत.
'निर्णयाची गरज'
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे वर्ष वाया जावू नये, म्हणून शासन, शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सांगत आहेत.