ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (cm eknath shidne) ठाणे जिल्ह्यात आजही बहुतांश आदिवासी गावपाडयांवर (On tribal villages) जाण्या-येण्यास रस्ता नसल्याने रस्त्याअभावी अनेक आदिवासी रुग्णांचे जीव गेल्याच्या घटना घडतचं आहेत. आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. एका आदिवसी महिलेला प्रसूतीसाठी ( tribal patients suffer) नातेवाईकांना झोळीतुन सुमारे ४ किलोमीटर लांब पायपीट करत रुग्णालयात दाखल करावे लागले. धक्कादायक बाब म्हणजे जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून गरोदर महिलेला नातेवाईकांनी झोळीतून रुग्णालयापर्यंत पोहोचवले. मीना देवराम झुमरे (वय २७) असे प्रसूती झालेल्या मातेचे नाव आहे. अतातरी प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रेल्वे रूळ ओलांडत गाठले रुग्णालय (Reach hospital by crossing railway tracks) मीना झुमरे शहापूर तालुक्यातील कसारा गावापासून साडे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या राड्याचा पाडा येथे कुटूंबासह राहतात. त्यांना मंगळवारी सकाळच्या सुमारास प्रसूती कळा येऊन वेदना होत असल्याने तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नातेवाईक निघाले होते. मात्र, रस्त्याअभावी नातेवाईकांनी चादरच्या झोळीतुन जंगल, चिखलातुन पायपीट करत कसारा येथील शासकीय रुग्णालयात आणले. खळबळजनक बाब म्हणजे महिलेचा व तिच्या नवजात बालकाचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईकांसह तिच्या कुटूंबाने जीव धोक्यात घालून ४ ते ५ रेल्वे रूळ ओलांडत रुग्णालय गाठले असल्याचे स्थानिक गावकरी गणेश ठाकूर यांनी सांगितले आहे.
अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी ठाणे जिल्ह्यातील एकट्या शहापूर तालुक्यात सुमारे ६५ आदीवासी गावपाड्यांवर येण्याजाण्यासाठी रस्ता नसल्याने रस्त्या अभावी येथील गावकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून श्रमजीवी संघटनेने अनेक अंदोलन, उपोषणे केली. मात्र, प्रशासन आमच्या मागणीची दखल घेत नसल्याने अनेकांचे रस्त्या अभावी जीव गेल्याचे श्रमजीवी संघटनेचे शहापूर तालुका सचिव प्रकाश खोडका माहिती दिली आहे. विशेष म्हणजे आज १४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास तहसील कार्यलयावर श्रमजीवी संघटनेच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ डोली मोर्चा (protest against govt) काढण्यात आला आहे.