ठाणे - जाणता राजा म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय ( Chhatrapati Shivaji Jayanti 2022 ) दुसरं कुठलं नाव येत नाही. राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. महाराज समजून घ्यायला हवेत आणि ते समजण्यासाठी महाराजांचा इतिहास समजून तो आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे. म्हणून सुमन दाभोलकर या कलाकाराने आपल्या कलेच्या ( Sculpture of Shivaji Maharaj on Stone ) माध्यमातून शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.
गावच्या नदीवर गेल्यावर तिकडे एक दगड निदर्शनास आला. तात्काळ त्यावर महाराजच सकारावे असं वाटलं. कारण तो दगड हेच एक शिल्प होते त्या दगडाला कोणीही आकार दिला नाही. कोणत्याही प्रकारची काट छाट केली नाही. दगडाच्या नैसर्गिक आकाराचा वापर करून त्यावर फक्त रंगानी संस्कार केले. जेव्हा हे स्टोन आर्ट पूर्ण झालं त्यातूनच जणू महाराज गावच्या नदीकिनारी विराजमान झाल्याचे भासत होते, अशी भावना कलाकार सुमन दाभोलकर यांनी व्यक्त केली.
महाराजांना अभिवादन -
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला असून हा प्रयत्न नागरिकांना नक्कीच आवडेल ही भावना सुमन दाभोळकर यांची आहे. सुमन दाभोळकर यांनी याआधी देशातील अनेक मान्यवर हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांना अशाच पद्धतीने अभिवादन केले आहे.