ठाणे - कोरोना काळात गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सवांवर असलेल्या निर्बंधांनंतर राज्य सरकारने आता सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे येणारे सण उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे होणार आहेत. त्यामुळे गेली दोन वर्ष हाताला काम नसणाऱ्या कामगारांना पुन्हा एकदा रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी सण जल्लोषात साजरा करण्यास सांगत सर्व नियमांवरील निर्बंध मागे घेतल्याने ठाणे मुंबईतील गोविंदा पथक सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. तर यामुळे गणेशोत्सव आणि गोविंदा मंडळांसाठी लागणाऱ्या मंडळांच्या टी शर्ट ची देखील मोठी मागणी वाढली आहे. मात्र, महागाईचा फटका या व्यवसायावर पडलेला पाहायला मिळतोय.
दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांना शर्ट कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष छोटे मोठे व्यवसाय आणि उद्योगधंद्यांवर मोठं संकट ओढवलं होत. त्यातच सर्व सण उत्सवांवर राज्य सरकारने निर्बंध लादल्याने सण उत्सवांवर निर्जन आलं होत आणि याचाच फटका हातावर काम असलेल्या हजारो कामगारांना बसला होता. मात्र आता राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवून येणारे सण जोरदार साजरे करण्याचे आवाहन केल्याने या कामगारांच्या हाताला पुन्हा एकदा रोजगार मिळण्यास मदत होत आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या कलर प्रिंटिंग टी शर्ट्स ला यंदा मोठी मागणी असलेली पाहायला मिळतेय. त्यामुळे अनेक कुटुंबियांच्या हाताला काम मिळत आहे. ठाण्यातील चिराग नगर भागात अनेक वर्षांपासून टी शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय करणाऱ्या सुनील अवताडे यांच्याकडे ठाणे मुंबईतील मंडळांनी टी शर्ट प्रिंटिंगची काम दिली आहेत.
महागाई वाढली साहित्य ही महागले दोन वर्षानंतर हालाता काम मिळाले. मात्र, वाढत्या महागाईमुळे यंदा टी शर्ट प्रिंटिंगच्या किंमतीत ७० ते ८० टक्यांचा परिणाम झाला असल्याचे ते सांगतात. टीशर्टचे साहित्य प्रिंटिंगचे साहित्य रंग यांचे दर वाढल्यामुळे यंदा हा व्यवसायावर परिमान झाला आहे. आता काहीच नसल्यापेक्षा सुरू झालेला व्यवसाय हजारो कुटुंबीयांचा आधार बनला आहे.
हेही वाचा - Rebel MLA Case आमदारांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका, ॲड असीम सरोदे म्हणाले...