ठाणे : ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचा विनयभंग (young woman in Thane police station limits) करीत; तिला रिक्षाने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत व्हायरल झाला. दरम्यान तरुणीने ठाणे नगर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल (young woman in Thane police station limits) केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार ठाणे स्टेशन रोड परिसरात घडला.
तरुणीला नेले फरफटत : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तरुणी ही स्टेशन परिसरात उभी होती. त्यावेळी घटनास्थळी आलेल्या रिक्षाचालकाने तिला येतेस का म्हणत इशारा केला. यावर तरुणीने संताप व्यक्त करीत रिक्षा चालकाला धरले. मात्र रिक्षा चालक हा तरुणीचा हात झटकून रिक्षा घेऊन पाळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र तरुणीने त्याचा पिच्छा पुरविल्याने, रिक्षा चालक रिक्षा चालू करून पळत असतांना तरुणीने रिक्षाला पकडलेले होते. दरम्यान चालकाने तिला फरफटत नेऊन पळून गेला.
चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल : या दुर्घटनेत तरुणी जखमी झाली. जखमी अवस्थेत रस्त्यात पडलेल्या तरुणीला नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला केले. दरम्यान हा सगळा प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. सदर पीडित तरुणी हि २२ वर्षीय असून महाविद्यालयांत शिक्षण घेत असलायची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी तरुणीला पोलीस ठाण्यात नेऊन; रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. रिक्षाचालक फरार असून ठाणे नगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान हा नेमका प्रकार काय होता. याबाबत तपासात निष्पन्न होणार आहे. ठाणे नगर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
या आधी ही अनेक प्रकार : याआधी अनेकदा रिक्षाचालकांनी महिलांच्या बाबतीत अशा प्रकारची मुजोरी करत विनयभंग पासून अगदी बलात्कारापर्यंतचे प्रयत्न केल्याचे, गुन्हे ठाण्यात दाखल झालेले आहेत. आता जर या रिक्षाचालकांची मुजोरी कमी करायची असेल, तर पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.