ठाणे - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: सह चालक आणि स्वीय साहायकांना शासनाकडून देण्यात येणारे वर्षभराचे वेतन गोरगरिबांच्या कल्याणासाठी सरकारी तिजोरीत जमा करण्याचे जाहीर केले आहे. संपूर्ण देशात अशापद्धतीने आपले वेतन सरकारी तिजोरीत जमा करणारे ते पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले आहेत.
राज्यातील आमदारांच्या वेतनामध्ये कपात केली जाणार असल्याचे मी ऐकले, असे आव्हाड म्हणाले. यानंतर 'माझा वर्षभराचा पगार सरकारी तिजोरीत जमा करून गोरगरिबांच्या आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वापरावा', अशी घोषणा त्यांनी केली.
'माझ्यासाठी सरकारकडून जे काही अर्थसाहाय्य होते, त्यामध्ये माझा चालक, स्वीय साहायक तसेच माझा पगार, हे सर्व सरकारी तिजोरीमध्ये जमा करा', असे ते म्हणाले.
'माझ्याकडून फुल न फुलाची पाकळी; छोटासा हातभार लागला तर खूप बरे होईल', असेही ते म्हणाले.