ठाणे - पोलीस ठाण्याचा परिसर म्हणजे जुन्या भंगार गाड्यांनी व्यापलेला भाग. कारवाईत जप्त केलेल्या साहित्याचा ढिगारा आणि गुन्हेगारांशी सततच्या संपर्क यामुळे काहीसे भकास चित्र डोळ्यासमोर येते, मात्र ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वर्तकनगर आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेरील उद्यानांच्या निर्मितीमुळे हे चित्र पालटले आहे.
हेही वाचा... सुपरस्टार रजनीकांत यांचा 'आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली' पुरस्काराने सन्मान
पोलीस ठाण्याबाहेरील चित्रही अत्यंत देखणे असू शकते, हे या ठाण्याबाहेर पोहोचल्यानंतर लक्षात येते. वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या मागच्या भागात पोलीस कर्मचारी आणि ठाणेकरांनी एकत्र येऊन एक उद्यान खुलवले आहे. फुलझाडे, शोभिवंत वनस्पती, सुगंधी वृक्ष आणि गवताची हरवळ फुलवली आहे. त्यामुळे या उद्यानामध्ये सध्या फुलपाखरांचा बहर आला आहे. शेकडो फुलपाखरे या भागात वावरताना दिसत आहे.
हेही वाचा... IFFI 50 : राजकारण आणि धर्मांधतेमुळ निर्वासितांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर - गोरान पास्कल्जेविक
वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या परिसरात ठाणे महापालिकेच्या मालकीचे उद्यान असले, तरी त्या उद्यानाची संपूर्ण जबाबदारी येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी घेतली. आवश्यक सुधारणा छोटे सौंदर्य वाढवणारे बदल करून हे उद्यान येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक विकसित केले. बदलांची एक जोडी इथे आल्याने त्यांच्यासाठी छोटे तळेही तयार करण्यात आले. या उद्यानात एक फेरफटका मारला तरी मन प्रसन्न होते, असे येथील कर्मचारी सांगतात.
हेही वाचा... माजी मंत्री सुरेश जैनांना वैद्यकीय उपचारासाठी ३ महिन्यांचा जामीन मंजूर
२०१७ मध्ये या पोलीस ठाण्याचा कायापालट करण्यात आला होता. मुस्कान केंद्र, उपहारगृहासारख्या सोयी येथे उपलब्ध करण्यात आल्या. त्यानंतर संरक्षण भिंतीवर व्हर्टिकल गार्डन तयार करून पोलिसांनी हा परिसर अधिक देखणा करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक घरगुती भांडणे, क्षुल्लक कारणांवरून तक्रार करण्यासाठी येणारी मंडळी पोलीस ठाण्याच्या परिसरात आल्यानंतर निवळतात. येथील उद्यानांमधील हे सौंदर्य पाहिल्यानंतर मनातील राग आणि तणाव दूर झाल्यानंतर काही मंडळी क्षुल्लक भांडण विसरूनही जातात. तर काहीजण या उद्यानाबद्दल पोलिसांचे आभार मानतात, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.