ETV Bharat / city

Expensive gift status on WhatsApp to impress girlfriend प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी महागड्या गिफ्टचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस; अन्‌ पोलिसांनी केली अटक - Boyfriend arrested for posting whats app statue

प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रियकराने व्हॉट्सअ‍ॅपवर खास महागड्या गिफ्टस्‌चे स्टेटस expensive gift on WhatsApp status ठेवले होते. विशेष म्हणजे, चोरीच्या रक्कमेतून प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देऊन त्याचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर ठेवल्याने चोरटा प्रियकर अंबरनाथ पोलिसांच्या तावडीत अडकला. राज आंबवले असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. आरोपीने गुन्हा कबूल करताच त्याला अटक करून २ सप्टेंबरला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. Thane Police arrested accused based on WhatsApp status

Boyfriend arrested for posting expensive gift WhatsApp status to impress girlfriend in Thane
चोरट्या प्रियकराला व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटसच्या आधारे अटक
author img

By

Published : Sep 3, 2022, 5:14 PM IST

ठाणे : प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रियकराने व्हॉट्सअ‍ॅपवर खास महागड्या गिफ्टस्‌चे स्टेटस expensive gift on WhatsApp status ठेवले होते. विशेष म्हणजे, चोरीच्या रक्कमेतून प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देऊन त्याचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर ठेवल्याने चोरटा प्रियकर अंबरनाथ पोलिसांच्या तावडीत अडकला. राज आंबवले असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. आरोपीने गुन्हा कबूल करताच त्याला अटक करून २ सप्टेंबरला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. Thane Police arrested accused based on WhatsApp status

काढलं होते आरोपीला कामावरून - अंबरनाथ पश्चिम भागातल्या रेल्वे स्थानकानजीक सुनील महाडिक यांच्या मालकीचे ओम श्री साईराम नावाने पूजेचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानात आरोपी राज कामाला होता. मात्र काही महिन्यापूर्वी त्याने पैश्याची अफरातफर केल्याने त्याला महाडिक यांनी कामावरून काढून टाकले होते. त्यातच २४ ऑगस्ट रोजी महाडिक यांनी घाऊक विक्रेत्याकडून पूजेचे साहित्य घेतले होते. त्याच विक्रेत्या देण्यासाठी रोकड दुकानाच्या गल्ल्यात ठेवली होती. मात्र त्या दिवशी घाऊक विक्रेत्या रोकड घेण्यासाठी आला नसल्याने रोकड गल्ल्यात ठेवून घरी गेले . मात्र २५ ऑगस्ट रोजी दुकानात आले असता त्यांच्या दुकानाची ग्रील कापलेली आणि कुलूप तोडलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले. तर गल्ल्याची चावीने उघडून त्यामधील दोन लाख रोकड शिवाय एक सोन्याची चेन चोरून नेल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर महाडिक यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात रोकड व सोनसाखळी चोरीला गेल्याची अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दिली.

गल्ल्याची चावी कुठे ठेवायचे, हे केवळ आरोपीलाच माहीत- दुकान मालक महाडिक यांच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या आरोपी राज याने त्याच्या व्हॉट्सऍप स्टेटसवर गर्लफ्रेंडला नवीन महागडा आयफोनसह नवीन ऍक्टिव्हा घेतल्याचे तीन-चार दिवसापूर्वी फोटो स्टेटसवर अपलोड केले होते. त्यानंतर महाडिक यांनी राज याच्या मोबाईलमधील स्टेटस पाहताच महाडिक यांना संशय आला. विशेष म्हणजे महाडिक यांच्या दुकानाच्या गल्ला चावीने उघडून चोरी झाली. आणि मालक गल्ल्याची चावी कुठे ठेवायचे, हे केवळ आरोपी राज यालाच माहीत होते. त्यामुळे महाडिक यांनी पोलिसांकडे याबाबतचा संशय व्यक्त करताच पोलिसांनी राज याला अंबरनाथ मधून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, मालकाने कामावरून काढल्याचा राग आणि प्रेयसीला महागडा फोन, दुचाकी भेटवस्तू देण्यासाठी चोरी केल्याची कबुली त्याने पोलिसांनी दिली आहे. गुन्हा कबूल करताच त्याला अटक करून २ सप्टेंबरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - Thane Crime रूम पार्टनर मैत्रिणीने दिला दगा; 'फोन पे'चा वापर करून गुपचूप रक्कम केली वळती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.