ठाणे - रेल्वेच्या टॉवर व्हॅनवर चढलेला १२ वर्षीय मुलगा भाजल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. कुणाल जगताप असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
गंभीर जखमी झालेला कुणाल हा विठ्ठलवाडी येथील रहिवाशी आहे. बदलापूर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर कर्जत दिशेला रेल्वेच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी वापरण्यात येणारी टॉवर व्हॅन उभी होती. या व्हॅनवर चढल्याने कुणालला रेल्वेच्या वीजवाहक तारांचा शॉक लागला. त्यामध्ये तो गंभीररीत्या भाजला. एएसई जाधव व हेड कॉन्स्टेबल बांदेकर यांनी त्याला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.