ETV Bharat / city

Thane Crime : पाच वर्षानंतर माय लेकरांची भेट; खांदेश्वर पोलिसांची कारवाई

पाच वर्षापासून मुलगा घरातून पळून गेला होता. तब्बल पाच वर्षाने मुलाला पाहून त्याच्या आईवडिलांना अश्रू अनावर (Boy meets Parents after Five Years) झाले होते. खांदेश्वर पोलिसांच्या कामगिरीमुळे हे शक्य झाले.

Thane Crime
Thane Crime
author img

By

Published : Dec 23, 2021, 8:17 AM IST

नवी मुंबई - पाच वर्षापासून हरवलेल्या मुलाचा खांदेश्वर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्वक तपास करुन शोध घेतला आहे. संबधित मुलगा कोणासही कल्पना न देता घरातून बाहेर पडला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे अखेर मुलगा घरी परतला. अखेर पाच वर्षाने मुलाला पाहून त्याच्या आईवडिलांना अश्रू अनावर (Boy meets Parents after Five Years) झाले होते.

खांदेश्वर पोलिसांची कारवाई

न सांगता मुलगा पडला होता घरातून बाहेर
पाच वर्षांपूर्वी १८ वर्षीय कुशल कृष्णा ठाकुर हा मुलगा नवीन पनवेल येथील ओमकार बिल्डींग, रूम क्रमांक २०२ येथे राहत होता. मात्र, दिनांक ०५ डिसेंबर २०१६ रोजी ४ वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही काहीही कल्पना न देता निघून गेला होता. याप्रकरणी मुलाचे वडील कृष्णा हिराजी ठाकुर यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. घरातून निघून जाताना मुलाने कोणत्याही प्रकारची चिठ्ठी अथवा पुरावा ठेवला नव्हता. त्यामुळे मुलाला शोधून काढणे हे पोलीसांसमोर आव्हान होते.

मुलाने वारंवार बदलला फोन
जुन्या अवघड प्रकरणांकडे स्वतः लक्ष जातीने लक्ष घालुन अशी प्रकरणे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुभाष कोकाटे यांनी आदेश दिले. खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांच्या माध्यमातून केले जात होते. मिसिंग असलेला कुशल कृष्णा ठाकुर याच्या पॅनकार्डवरून त्यांच्या बँक अकाउंटची माहिती मिळवण्यात आली. बँक खाते उघडलेला फॉर्म मिळवून संबधित मुलाचा क्रमांक मिळविण्यात आला. या मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. संबधित मिसिंग मुलगा सतत मोबाईल फोन बंद-चालु करीत होता व राहण्याचे ठिकाणही सतत बदलत होता त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण बनले होते.

कौटुंबिक कलहामुळे मुलगा घर सोडुन गेला
२०१६ पासून हरवलेला मुलगा कुशल कृष्णा ठाकुर (२३) याला नवी मुंबई पोलिसांनी मुंबईतील खार परिसरातून तब्बल पाच वर्षानंतर ताब्यात घेऊन उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. घरातील वारंवार होणाऱ्या भांडणामुळे हा मुलगा घर सोडुन गेला होता व मुंबईत स्विगीमध्ये डिलेव्हरी बॉय म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली. संबधित मुलाला सुखरूपपणे त्याच्या आई वडीलांकडे सुपूर्द आले असुन या मुलाचा पोलीसांनी शोध घेतल्यामुळे त्याच्या आई वडीलांनी आनंद व्यक्त करून पोलीसांचे आभार मानले आहे. पाच वर्षाने हरवलेला मुलगा पाहून आईवडिलांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा - TET Exam Scam update : तुकाराम सुपे यांच्याकडून पुन्हा पुण्यातून 10 लाख जप्त.. एकूण 2 कोटी 58 लाख रुपये जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.