ETV Bharat / city

परमबीर सिंग मुख्य आरोपी असलेल्या गुन्ह्यातील दोघांना ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर - Crimes of ransom

परमबीर सिंग यांच्यावर ठाण्यासह मुंबईत अनेक ठिकाणी खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. या सर्व गुन्ह्यात सिंग हे मुख्य आरोपी आहेत. मात्र, त्यांना अटक झालेली नाही. दरम्यान, तब्बल 50 दिवस कारागृहात बंदिस्त असलेल्या आणि आणि खंडणीच्या गुन्ह्यात फरारी असलेले मुख्य आरोपी सिंग यांचा शोध तपास यंत्रणा घेत असतानाही ते मिळून न आल्याने, सदर आरोपी सुनील जैन आणि संजय पूनमिया यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

परमबीर सिंग मुख्य आरोपी असलेल्या गुन्ह्यातील दोघांना ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

author img

By

Published : Sep 30, 2021, 1:55 PM IST

ठाणे - ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर ठाण्यासह मुंबईत अनेक ठिकाणी खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. या सर्व गुन्ह्यात सिंग हे मुख्य आरोपी आहेत. मात्र, त्यांना अटक झालेली नाही. दरम्यान, तब्बल 50 दिवस कारागृहात बंदिस्त असलेल्या आणि आणि खंडणीच्या गुन्ह्यात फरारी असलेले मुख्य आरोपी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा शोध तपास यंत्रणा घेत असतानाही ते मिळून न आल्याने, सदर आरोपी सुनील जैन आणि संजय पूनमिया यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

चार कोटी 68 लाखाच्या खंडणीचा गुन्हा

ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात (24 जुलै)रोजी ठाणे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, पराग बनेरा, सुनील जैन, संजय पूनमिया आणि मनोज घोटकर यांच्या विरोधात चार कोटी 68 लाखाच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सुनील जैन आणि पूनमिया यांना अटक करण्यात आली. तर अन्य आरोपी अद्यापही फरार आहेत. तर, दुसरीकडे ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा 29 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्य आरोपी परमबीर सिंग हेच आहेत. (23 जुलै)रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये तक्रार श्यामसुंदर अग्रवाल यांनी गुन्हा दाखल केला. तर, 23 जुलै रोजी श्याम सुंदर अग्रवाल यांचा पुतण्या शरद अग्रवाल यांनी कोपरीतील हा गुन्हा दाखल केला होता.

अटक केल्यानंतर कोपरी पोलिसांनी त्यांना अटक केली

कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोपरी पोलिसांनी अटक केलेल्या सुनील जैन आणि संजय पूनमिया या दोन आरोपींना मागील 50 दिवसांपासून कारागृहात ताब्यात घेतले होते. सुनील जैन आणि संजय पूनमिया हे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर दाखल झालेल्या कोपरीतील गुन्ह्यात आरोपी आहे. यापुर्वीच मरीन ड्राईव्ह येथे दाखल खंडणीच्या गुन्ह्यात पूनमिया आणि जैन यांना अटक केल्यानंतर कोपरी पोलिसांनी त्यांना अटक केली. तब्बल 50 दिवस कारागृहात बंदिस्त असलेल्या आणि आणि खंडणीच्या गुन्ह्यात फरारी असलेले मुख्य आरोपी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा शोध तपास यंत्रणा घेत असतानाही ते मिळून न आल्याने सदर आरोपींना जामिनावर मुक्त करावी असा युक्तिवाद ठाणे सत्र न्यायालयात वकील शैलेश सडेकर आणि राजन साळुंखे यांनी केला.

कोट्यवधींची खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा

खोट्या केसमध्ये अडकवून कोट्यवधींची खंडणी वसुली प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. परमबीर यांच्यासह एकूण 28 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि ठाण्यातील एका समाजसेवकाचाही समावेश आहे. येथे परमबीरसिंह यांच्या विरोधात पाच प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, तक्रारदार केतन तन्ना, सोनू जालान आणि रियाज भाटी या तिघांनी परमबीरसिंग आणि त्यांचे २७ सहकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ठाणे नगर पोलिसांनी गुरुवारी सोनू जालान यांचा जबाब नोंदविला होता.

आयुक्तांसह २८ जणांचा गुन्ह्यात समावेश

ठाणे नगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दाखल झालेल्या गुन्ह्यात तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, दीपक देवराज, एन. टी. कदम, चकमक फेम प्रदीप शर्मा, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे माजी वरिष्ठ राजकुमार कोथीमिरे, स.पो.उप.नि. मोरे, पोलीस कर्मचारी चौधरी, विकास दाभाडे, रितेश शहा, दिपल अग्रवाल, रवी पुजारी, संजय पुंनमिया, अनिल सिंग, बच्ची सिंग, जुबेर मुजावर, सुनील देसाई, मनीष शहा उर्फ चोटी , किशोर अग्रवाल, बरखा अग्रवाल, समाजसेवक बिनु वर्गीस, तारीख परवीन, देवा भानुशाली, अंकित भानुशाली, विशाल कारिया , प्रदीप सोदानी, प्रशांत कोठारी, दीपक कपूर, नागेश यांचा समावेश आहे.

हेही वाचा - खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल, रवी पुजारीच्या नावाचाही समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.