ETV Bharat / city

Lotus Operation मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रवास योजनेच्या नावाखाली भाजपचे लोटस ऑपरेशन

Lotus Operation दोन महिन्यापूर्वीच शिंदे गटाला भाजपने पाठबळ देत, शिवसेनेनेत उभी फूट पाडून राज्यात सत्ता मिळवली. आता तर महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 45 खासदार निवडून आणण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाने प्रवास योजनेच्या नावाखाली आखली आहे. विशेष म्हणजे याची सुरवातच मुखमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

Lotus Operation
Lotus Operation
author img

By

Published : Sep 14, 2022, 10:49 PM IST

ठाणे दोन महिन्यापूर्वीच शिंदे गटाला भाजपने पाठबळ देत, शिवसेनेनेत उभी फूट पाडून राज्यात सत्ता मिळवली. आता तर महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 45 खासदार निवडून आणण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाने प्रवास योजनेच्या नावाखाली आखली आहे. विशेष म्हणजे याची सुरवातच मुखमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. मंत्री ठाकूर यांच्या तीन दिवसाच्या प्रवास योजने दरम्यान सर्व विभागातील शासकीय अधिकाऱ्यांमध्ये स्थानिक भाजपच्या नेत्यांचा दरारा निर्माण करून राजकीय खेळी करत भाजपने लोटस ऑपरेशनची सुरवात केली आहे. यामुळे जिल्ह्यातील आगामी सर्वच निवडणुकांमध्ये भाजपा आपला झेंडा रोवून कब्जा करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले आहे.

भाजपचे लोटस ऑपरेशन

विधानसभा लढविण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी भाजपचे मिशन 45 अंतर्गत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अंबरनाथ परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र घेत, त्यांना आगामी निवडणुकांमध्ये येणाऱ्या समस्याही जाणून घेतल्या आहेत. विशेष म्हणजे कल्याण लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभामध्ये १ राष्ट्रवादी, १ मनसे, १ शिंदे गट तर ३ भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे अध्याहून अधिक मतदारसंघ भाजपच्या कब्जात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा असून त्यांच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून लोकसभासह 6 विधानसभा लढविण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष लक्ष घालत असल्याने राजकीय चर्चाला उधाण आले आहे.

दौऱ्याची सुरवात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रवास योजनेच्या दौऱ्याची सुरवात राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीतुन करण्यात आली होती. विशेष म्हणजे डोंबिवली कायमच भाजपचा गड राहिला आहे. तर पहिल्याच दिवसाची शिंदे गटाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवलीतील निवासस्थानी जाऊन मंत्री ठाकूर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे न्याहरी केली. मात्र कुठलीही राजकीय चर्चा दोघामध्ये झाली नसल्याचे खुद्द मंत्री ठाकूर यांनी सांगत डॉ . श्रीकांत माझे मित्र आहेत त्या नात्याने मी त्याच्याघरी आल्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र तीन दिवसाच्या प्रवासात कुठंही शिंदे गटाचा लोकप्रतिनिधी अथवा पदाधिकारी मंत्री ठाकूर यांच्या सोबत दिसला नाही.

शासकीय अधिकाऱ्यांविषयी जाहीर नाराजी दुसऱ्या दिवशी मंत्री ठाकूर हे कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्याचा मेळावाल्या हजेरी लावत त्यानंतर कार्यकर्त्याची भेटीगाठी घेऊन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभागृहात कल्याण लोकसभा मतदार संघात येणाऱ्या महापालिका, नगरपरिषदसह विविध विभागातील जवळपास ३० ते ३५ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत केवळ केंद्रीय मंत्री ठाकूर, भाजप आमदार, नगरसवेक आणि पदाधिकारी उपस्थित होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत बहुतांश अधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा मंत्री ठाकूर यांच्यासमोर भाजप आमदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांना वाचला. यामुळे ही बैठक तब्बल चार तास चालली होती. या बैठकीत बहुतांश बड्या अधिकाऱ्यांना मंत्री ठाकूर यांनी खडेबोल सुनावत आमच्या नेत्यांचे आदी कामे करा, असे निर्देश दिले. तर बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांविषयी जाहीर नाराजी प्रकट केली आहे.

तिसऱ्या दिवसाची सुरवात त्यांनी शिंदे गटाचे आमदार डॉ. किणीकर यांच्या अंबरनाथ मतदारसंघातुन केली. मात्र या दौऱ्यावेळी पावसाची रीपरीप सुरु असतानाही मंत्री ठाकूर यांच्या स्वागताची ठिकठिकाणी भाजपने कार्यक्रम आयोजित केले होते. तर सायंकाळी उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार अलायनी यांच्या कार्यलयाला भेट देऊन त्यावेळी कार्यकर्त्याच्या समस्या जाणून घेतल्या तर दौऱ्याचा समारोप पत्रकार परिषद घेऊन मंत्री ठाकूर यांनी केला. यावेळी पत्रकार परिषदेत तीन दिवसाचे भाजपचे लोकसभा निवडणूकीचे मिशनसह तीन दिवसात घडलेल्या घडामोडी त्यांनी सांगितल्या. एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या जिल्हावर भाजपने राजकीय कब्जा करण्याच्या हालचाली करत असल्याचे प्रवास योजनेच्या तीन दिन दिवसाच्या मंत्री ठाकूर यांच्या दौऱ्यात दिसून आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.