ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांच्या गुंडांकडून मला गोळ्या घालण्याच्या धमक्या, किरीट सोमैय्या यांचा गंभीर आरोप - किरीट सोमैय्या यांनी गोळी घालण्याची धमकी

तुम्ही कितीही मोठे गुंड आणलात, अगदी दाऊद इब्राहिमला जरी आणलात तरीही आपण घोटाळ्याबाबत खुलासे करत राहणारच, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी थेट ठाकरे सरकारलाच खुले आव्हान दिले आहे.

kirit somaiyas serious allegations on cm

author img

By

Published : Sep 8, 2021, 4:15 PM IST

Updated : Sep 8, 2021, 4:44 PM IST

ठाणे - तुम्ही कितीही मोठे गुंड आणलात, अगदी दाऊद इब्राहिमला जरी आणलात तरीही आपण घोटाळ्याबाबत खुलासे करत राहणारच, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी थेट ठाकरे सरकारलाच खुले आव्हान दिले आहे.

माजी खासदार आणि ज्येष्ठ भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी आज ठाण्यात अनेक गौप्यस्फोट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक नंबरचे घोटाळेबाज असून त्यांनी 19 बंगल्यांचा घोटाळा केल्याचा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेचे लोक मला गोळ्या घालण्याच्या धमक्या देत असून त्यावर मुंबई पोलीस काहीच कारवाई करत नाहीत, असा थेट आरोप त्यांनी केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनच्या 114 फ्लॅटला OC मिळाली नाही व स्वतः भूषण गगराणी यांनी हे सगळे अनधिकृत बांधकाम असून त्याला अधिकृत करता येणार नाही, असे बोलले आहेत. त्यामुळे प्रताप सरनाईक यांची सर्व मालमत्ता विकून ठाणे महानगरपालिकेने थकबाकी वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली. आपण ज्या 12 मंत्र्यांची नावे दिली आहेत ते सर्व गुन्हेगार असून शरद पवार त्यांना पाठीशी घालत आहेत तर भावना गवळी त्यांच्या बाबतीत असा खुलासा आपण पुण्यातील पत्रकार परिषदेत उद्या करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आपले तोंड बंद करण्याचा आदेश दिल्याने आपल्यावर सतत हल्ले होत असल्याचे पाहूनच केंद्र सरकारने आपल्याला झेड सिक्युरिटी दिल्याचे त्यांनी सांगितले.

किरीट सोमैय्या पत्रकारांशी बोलताना

दाऊदला जरी आणलात तरी घाबरणार नाही - सोमैय्या

प्रसारमाध्यमांशी बोलतांना सोमैय्या यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारला जागेवर आणण्याचे काम मी करत आहे, त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोप उडाली आहे. यामुळेच काही मंत्री गुंडांची मदत घेत आहेत. वाशिममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्यात भावना गवळींचे काही गुंड लोक होते. मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, कितीही गुंडांना बोलावले आणि दाऊदला जरी आणले तरी मी घाबरणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

हे ही वाचा - धक्कादायक.. अँटिलिया प्रकरणी तपासाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिंगानी सायबर तज्ज्ञाला दिली ५ लाखांची लाच

मनसूख हिरेन यांना न्याय मिळाल्याने सोमैय्यांचे समाधान -

ठाण्यातील व्यापारी मनसूख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून विचारपूस ही केली. सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. सदर गाडी ही ठाण्यातील प्रसिद्ध व्यापारी मनसुख हिरेन यांची असल्याचे कळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती परंतु मनसुख किरण यांचेच शव मुंब्रा येथील खाडीत मिळाल्याने सनसनाटी पसरली होती. आता यातील तपास यंत्रणांनी यासंदर्भात न्यायालयात चार्जशीट दाखल केल्याने मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी अपेक्षा किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार हे भ्रष्ट सरकार असून तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडून कोट्यावधी रुपये घेतल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, सचिन माझे आणि इतरांना याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरही आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागतील व मनसू फिरे यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा - पोर्नोग्राफी प्रकरण : अभिनेत्री गहना वशिष्ठचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Last Updated : Sep 8, 2021, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.