नवी मुंबई - नवी मुंबईमध्ये भाजपला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. नुकताच भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. ही घटना ताजी असताना पुन्हा एक नगरसेविका व माजी नगरसेवक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपच्या नवीन गवते, दिपा गवते आणि अपर्णा गवते यांनी भाजपला सोडसिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले होते. धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही गणेश नाईक यांचे खंदे समर्थक होते. त्यामुळे ते पक्ष सोडत असल्याने नवी मुंबईत भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं चित्र आहे.
भाजपच्या आणखी दोघांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश-
भाजप नगरसेविका दिव्या गायकवाड माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. दिव्या गायकवाड प्रभाग 64 मधून निवडून आल्या होत्या. गणेश नाईक यांच्यासह त्याांनी भाजप प्रवेश केला होता. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून या दोन्ही आजी माजी नगरसेविका व नगरसेवक यांनी घरवापसी केली आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा- नाशिक : भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेच्या गळाला लागल्याची शक्यता