ETV Bharat / city

Biker Fell Into Ditch : घोडबंदर येथील खड्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - दुचाकीस्वाराचा मृत्यू

पावासमुळे रस्त्यावर झालेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाला मंगवारी आपला जीव गमवावा लागला. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास काजूपाडा, घोडबंदर रोड येथे ही घटना घडली. ठाण्याकडून मुंबईकडे जात असताना खड्ड्यामध्ये दुचाकी गेल्याने तोल जाऊन दुचाकीस्वार दुचाकीवरून रस्त्यावर पडला ( Biker Fell Into Ditch ) व त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ( Biker Dead In Accident )

http://10.10.50.85//maharashtra/05-July-2022/mh-thn-05-biker-dead-7204282_05072022222641_0507f_1657040201_625.jpg
Biker Dead In Accident
author img

By

Published : Jul 6, 2022, 10:32 AM IST

Updated : Jul 6, 2022, 1:36 PM IST

ठाणे - पावसामुळे रस्त्यांची अवस्था खराब होऊन रस्त्यांवर दरवर्षी मुंबई, ठाण्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. पावसाच्या पाण्यामुळे अशा खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अशा खड्ड्यांमध्ये पडून अनेकदा अपघात होतात. मंगळवारीही एक दुचाकीस्वार साडेतीनच्या सुमारास अशाच एका खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडला. ( Biker Fell Into Ditch ) तो खड्ड्यात पडला त्याचवेळी मागून एसटी महामंडळाची बस येत होती. या बसखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. ( Biker Dead In Accident ) या घटनेप्रकरणी काशिमीरा पोलिस्ट स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

  • A rider died after his bike overturned due to a pothole & an ST bus coming from rear drove over him in Thane's Ghodbunder Road, Kajupada area at around 11 am y'day. Kashimira PS registered an Accidental Death Report & started further investigation: Thane Municipal Corporation pic.twitter.com/cB7zkSydY4

    — ANI (@ANI) July 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

खड्ड्याने घेतला पहिला बळी - यावर्षीच्या पावसात पडलेल्या रस्त्यावरील खड्ड्याने पहिला बळी घेतला आहे. काजूपाडा, घोडबंदर रोडवरून हा तरुण ठाणेकडून मुंबईकडे चालला होता. या रस्त्यावरी खड्ड्यामध्ये दुचाकी गेल्याने तोल जाऊन तो दुचाकीवरून रस्त्यावर पडला व त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसच्या मागील चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होण्याची शक्यता असल्याने तात्काळ खड्डे बुजवण्यात आदेश देण्यात आले आहेत.

लोकल सेवा ठप्प - मुंबईत बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही जोरदार बरसला. याचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला. रात्री ८.४५ क्या सुमारास दादर येथे पॉइंट फेलीयर मुळे लोकल सेवा ठप्प झाली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडून ठाणे कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या. याचा फटका कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना बसला. रात्री १०.१० वाजता सुमारे दीड तासाने लोकल सेवा सुरू झाली. मात्र लोकल सेवा धिमा गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल झाले.

सखल भागात पाणी साचले - मुंबईत गेले २४ तास पाऊस पडत आहे. यामुळे सायंकाळ पर्यंत मिलन सबवे वगळता कुठेही पाणी साचले नव्हते. मात्र रात्री ८ नंतर जोरदार पाऊस पडल्याने दादर हिंदमाता, काळाचौकी, दादर, शीव स्थानक, शीव-माटुंगादरम्यान, हिंदमाता, माहीम, भक्ती पार्क, दादर-परळ दरम्यान, कुर्ला-शीव दरम्यान, एस व्ही रोड (अंधेरी पश्चिम), कुर्ला एल वॉर्ड परिसर आदी सखल विभागात पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून मुंबईकर नागरिकांना आपले घर गाठावे लागले.

हेही वाचा - Youth died falling in mine: खदानीत पडून तरुणाचा मृत्यू, मुंबईतील दहिसर भागातील घटना

Last Updated : Jul 6, 2022, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.