ETV Bharat / city

Attack on Policeman son : भररस्त्यात पोलिसाच्या मुलावर चॉपरने वार; प्रकृती गंभीर

भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलावर हल्लेखोरांनी धारदार चॉपरने सपासप वार (Attack on Policeman son in kalyan) करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरातील रस्त्यावर घडली आहे. अजित फुलचंद जाधव असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे नाव आहे.

crime
पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलावर हल्ला
author img

By

Published : Feb 16, 2022, 6:35 PM IST

Updated : Feb 16, 2022, 7:40 PM IST

ठाणे - भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलावर हल्लेखोरांनी (Attack on Policeman son in kalyan) धारदार चॉपरने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरातील रस्त्यावर घडली आहे. अजित फुलचंद जाधव असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे नाव आहे. तर मुख्य आरोपी सूत्रधार अमोल भंडारी याला अटक करण्यात आली असून, अक्षय मोरे, गणेश सानप, साहिल मोरे असे फरार हल्लेखोरांची नावे आहेत.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चार हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून एका हल्लेखोराला अटक केली आहे. तर तीन हल्लेखोर फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

जखमी अजितची आई

अचानक जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ-

हल्ल्यात गंभीर जखमी अजितचे वडील मुंबई पोलीस दलातील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असून जाधव कुटुंबीय कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात राहतात. त्यातच अजित काल (मंगळवारी) एका खासगी कंपनीत इंटरव्ह्यू देऊन सायंकाळच्या सुमारास आल्यानंतर तो आणि त्याचे मित्र विजयनगरमधील रस्त्याच्याकडेला उभे राहून गप्पा गोष्टी करत होते. त्यावेळी अचानक हल्लेखोरांनी अजितच्या पाठीवर आणि हातावर चॉपरने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. अजित रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. तर त्याच्या नातेवाईकाने मित्राच्या मदतीने त्याला कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

हल्ल्याचे कारण अध्यापही अस्पष्ट -

दरम्यान, काही तासातच कोळसेवाडी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अमोल भंडारीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर तीन हल्लेखोर फरार झाले आहेत. मात्र, जीवघेण्या हल्ल्याचे कारण अद्यापही समजू शकले नसून, याचा तपासही पोलिसांनी सुरु केला आहे. मात्र पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पाहवयास मिळाले आहे.

Last Updated : Feb 16, 2022, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.