ETV Bharat / city

मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमधून बाहेर काढणाऱ्याचा एटीएसने घेतला जवाब

५ तारखेला मुंब्रा रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर मृतदेह काढण्यासाठी ज्या रुग्णवाहिका चालकाने मदत केली होती त्या चालकांना आता एटीएसने चौकशीसाठी बोलवले आहे.

Mansukh Hiren
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
author img

By

Published : Mar 12, 2021, 6:00 PM IST

Updated : Mar 12, 2021, 6:10 PM IST

ठाणे - ५ तारखेला मुंब्रा रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर मृतदेह काढण्यासाठी ज्या रुग्णवाहिका चालकाने मदत केली होती त्या चालकांना आता एटीएसने चौकशीसाठी बोलवले आहे. चौकशीनंतर त्यांचा जवाब नोंदवला जाणार आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील मास्कच्या आत चार ते पाच रुमाल आढळून आले होते. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाली असल्याचा संशय निर्माण झाला. त्यामुळे आता एटीएसने अब्दुल मामू या रुग्णवाहिका चालकाला घटनास्थळाची माहिती घेण्यासाठी आणि प्रत्यक्षदर्शी म्हणून जवाब नोंदवण्यासाठी ठाणे एटीएस कार्यालयात बोलावले आहे.

प्रतिनिधी मनोज देवकर यांनी रुग्णवाहिका चालक सज्जाद सुलतानसोबत केलेली बातचीत

हेही वाचा - 'डीएमके'च्या उमेदवारांची यादी जाहीर; स्टॅलिन यांच्या मुलालाही तिकीट

कोण आहे अब्दुल्ला मामू?

मुंब्रा कौसा भागात बेवारस मृतदेह सापडल्यावर अब्दुल्ला मामू यांना तो घेण्यासाठी फोन आला होता. मामू हे मृतदेहांना रुग्णालयात घेवून जाण्याचे काम मागील अनेक वर्षापासून करत आहेत. त्यांचे मामू असे टोपण नाव आहे. त्यांना त्यांच्या या कामाबाबत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

तो आवाज अब्दुल्ला यांच्या मित्राचा?

मनसुख हिरेन यांचा मृतदेह बाहेर काढल्यावर त्यांच्या तोंडावर मास्क होता. त्याला चिखल लागला होता. तो मास्क काढल्यावर त्याखाली चार पांच हात रुमाल होते. ते काढताना व्हिडिओ काढला होता. त्याचवेळी ही हत्या आहे असा आवाजही रेकॉर्ड झाला आहे. त्याबाबतही आता चौकशी होणार आहे.

गृह विभागाचे लेखी आदेश

गृह विभागाने मनसुख हिरेन प्रकरणात कोणतीही माहिती लीक होऊ नये यासाठी लेखी आदेश काढून माहिती कोणाला न देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - पोलिसांना कुत्रे म्हणणे अतिशय चुकीचे, अनिल बोंडेंवर कारवाई करा -हसन मुश्रीफ

Last Updated : Mar 12, 2021, 6:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.