ठाणे - आषाढी एकादशी ( Ashadhi Ekadashi ) तसेच उपवास हे पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या समीकरण यंदाही कायम राहणार आहे. या आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाच्या निमित्ताने ( Fasting on Ashadi Ekadashi ) सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या उपवासाच्या चवीच्या पदार्थांचा आस्वाद ठाण्यात घेता येणार आहे. उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी ही गोष्ट आता दुरापास्त झालेली आहे. कारण साबुदाणा खिचडीच्या व्यतिरिक्त अनेकही उपवासाचे रुचकर पदार्थ बनवून उपवास करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.
विविध प्रकारचे फरसाण साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे फलाहार बनाना हलवा मिक्स फ्रूट हलवा बदाम पिस्ता खीर स्पेशल उपवासाचे बर्फी, पेढे या सर्व पदार्थांचा आस्वाद आपल्याला आषाढी एकादशीच्या निमित्ताने ठाण्यात घेता येणार आहे. ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या प्रसिद्ध मिठाई विक्रेत्याने यंदा मोठा मेनू उपवासानिमित्त तयार केला आहे या मेनूचा आस्वाद जर आपणाला घ्यायचा असेल तर आषाढीच्या दिवशी आपल्याला हे पदार्थ उपलब्ध होणार आहेत.
प्रत्येक सणाला नवनवीन पदार्थ हे वैशिष्ट्य - ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानांमध्ये प्रत्येक सणाला नवीन नवीन पदार्थ आणले जातात सोन्याची मिठाई सोन्याचे मोदक पुरणपोळी तिळाचे लाडू अशा वेगवेगळ्या सणानिमित्त वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ या ठिकाणी मिळतात संकष्टीनिमित्त वेगवेगळे मोदक तिरंगा मिठाई है पदार्थ नागरिकांच्या नेहमी पसंतीला पडणारे आहेत.
हेही वाचा -Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार दोन टप्प्यात; 'या' तारखेची प्रतिक्षा