ETV Bharat / city

धक्कादायक ! मुलांना घरातून पळून जाण्याचा टिप्स देत होते अॅप; पोलिसांची कारवाई - ठाणे क्राईम

अल्पवयीन मुलांना पळून जाण्याच्या टीप दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूर शहरात उघडकीस आला आहे.

app give tips to child how to run far home
धक्कादायक ! मुलांना घरातून पळून जाण्याचा टिप्स देतयं हे अॅप; पोलिसांची कारवाई
author img

By

Published : Nov 5, 2021, 3:25 PM IST

ठाणे - सोशल मिडीयाच्या एका अॅपवर हायप्रोफाईल घरातील अल्पवयीन मुलांना पळून जाण्याच्या टीप दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूर शहरात उघडकीस आला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून एका अॅपवरील ग्रुपशी जोडल्या गेलेल्या 13 वर्षाचा मुलगा चर्चेला बळी पडून बदलापूर मधील घर सोडून थेट गोव्याला पलायन केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. मात्र बदलापूर पोलीस व कुटुंबाच्या सतर्कतेमुळे मुलाचा शोध लागला असून त्याला सुखरूप घरी आणल्याने कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला.

पोलिसांची प्रतिक्रिया
ऑनलाईन अॅपवरील चॅटिंगमुळे मुलाने काढला घरातून पळ -

बदलापूर शहरातील पूर्व भागातील उच्च्भू वस्तीत हा मुलगा कुटुंबासह राहतो. हा अल्पवयीन मुलगा रविवारी दुपारच्या सुमारास ‘ मी वर्षभराने घरी येईल' असे सांगत घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने मुलाच्या आईवडिलांनी शोध घेतला. मात्र, आढळून आला नाही. त्यामुळे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली. तक्रारीनंतर सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरु केला असता हा मुलगा इतर मित्रांसह डिस्कॉर्ड’ अॅपवर चॅटिंग करीत असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. विशेष म्हणजे त्यांनतर ‘रन अवे अॅण्ड गेट अ लाइफ’ या आनलाईन अॅपवर जॉईन होत, या मुलाने चॅटिंग करीत घरातून कसे पळून जावे या विषयावर इतरांशी चर्चा करीत होते. त्यातूनच मुलगा पळून गेला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती.

पीडित मुलाची प्रतिक्रिया
गोव्याच्या कलंगुटजवळ मोबाईलचे लोकेशन -

रविवारी या मुलाने गोवा गाठल्याचे पोलीस तपासात समोर आले. तर या मुलाचे गोव्याच्या कलंगुटजवळ असलेल्या एका हाँटेलमध्ये त्याचे मोबाईल लोकेशनमुळे आढळून आला. त्यानंतर त्याच्या कुटूंबाने गोवा गाठत त्याला गोव्यावरून मंगळवारी रात्रीच्या सुमारास बदलापुरामधील घरी आणले. विशेष म्हणजे त्याच्या जवळ असलेल्या मोबाईलमध्ये सिमकार्ड नव्हते. मात्र, मोबाईलवर वायफायच्या माध्यमातून तो इतर मित्र व कुटुंबाच्या संपर्कात होता. त्यामुळे कुटूंबाला त्याचा शोध लागला. त्यांनतर कुटूंबातील सदस्यांनीच त्याला पोलिसांच्या मदतीने गोव्यावरून घरी आणले. कुटुंबातील एका नातेवाईकाच्या मते आम्ही कुटूंबाने मुलाचा शोध घेण्यास खूपच मेहनत घेतली आहे. मात्र देवाच्या कृपेने आमचा मुलगा सुखरूप घरी आला, याचाच आम्हाला आनंद असून खऱ्या अर्थाने आमची दिवाळी साजरी केल्याचे त्यांनी म्हटलं.

युटयुबवरून माहिती मिळाल्याचे आले समोर -

पोलीस व कुटूंबाने मुलाचे शोध सुरु केला असता घराच्या आसपास असलेले अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी मुलगा बदलापूर ते कल्याण एका वाहनाने त्यांनतर कल्याण रेल्वे स्थनाकातून सायन रेल्वे स्थानकात उतरून तो सायन वरून खाजगी बसने कोल्हापूर मार्गे गोव्यात गेल्याचे निष्पन्न झाले. बदलापूर पोलिसांनी त्या मुलाकडे अधिक चौकशी केली असता, स्वत:चे पायावर उभे रहावे या कल्पनेतून घर सोडून गेल्याचे व डिसकॉर्ड या अॅपबदद्ल त्याला युटयुब वरून माहिती मिळाल्याचे समोर आले. सदर अॅपच्या बाबत अधिक माहिती घेवून यामध्ये इतर कोणता उददेश अथवा त्याकरीता त्याला कोणी मदत करीत होते फूस लावत होते. या अनुषंगाने पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी दिली. तर या मुलाच्या शोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदेश मोरे यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली.

सोशल मीडियावरील नियम केवळ कागदापुरते?

फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्ट्राग्रामवर अकाउंट सुरू करण्यासाठी 13वर्षे वय असणे गरजेचे आहे. असा नियम असला तरी या नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर बरेच अकाउंट तेरावर्षांखालील मुलांचे असल्याचे आढळते. तर बरेच मुले आपल्या पालकांचे अकाउंट चालवत असल्याचे समोर आले आहे. मुळात सोशल मीडियावर अकाउंट सुरू करण्यासाठी वय वर्षे 13 असणे आवश्यक असते. मात्र खाते सुरू करताना वयाची पडताळणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे हा नियम केवळ कागदापुरता मर्यादित असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.