ETV Bharat / city

अनाथ शबानाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर; महाविद्यालयात मिळाला ‘एमबीबीएस’ला प्रवेश - अनाथ शबाना शेख एमबीबीएस प्रवेश

शबाना शेखला पुढील शिक्षणासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने शबानाला अनाथ प्रमाणपत्र देण्यात ( orphan certificate to Shabana ) आले होते. त्यामुळे अधिकच मेहनत व जिद्दीने अभ्यास करून तिने स्वप्न सत्यात उतरून दाखवले आहे. शबानाने लहानपणापासूनच संस्थेत राहून महाविद्यायीन शिक्षण कष्टाने घेत, इयत्ता बारावीची परीक्षा दिली व त्यात तिला घवघवीत यश मिळविले. त्यानंतर तिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी ‘नीट’ची परीक्षाही उत्तीर्ण ( orphan Shabana Shaikh story ) झाली.

http://10.10.50.85:6060/reg-lowres/17-February-2022/mh-tha-4-badlapur-1-bayet-1-vis-1-photo-mh-10007_17022022152342_1702f_1645091622_1022.mp4

author img

By

Published : Feb 17, 2022, 8:44 PM IST

Updated : Feb 17, 2022, 10:08 PM IST

ठाणे - पालकांचे छत्र हरविलेल्या चार वर्षांची चिमुरडी लहानपणीच डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ( orphan girl to become doctor ) होती. शबाना शेख असे या अनाथ तरुणीचे ( orphan Shabana Shaikh story ) नाव आहे. बदलापूर येथील बॉम्बे टीन चॅलेंज ( Bombay teen challange ) संस्थेत लहानपणापासूनच संस्थेत राहून तिने महाविद्यायीन शिक्षण पूर्ण केले. शबानाला नुकताच ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळाल्याने डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न मार्गी लागणार आहे.

शबाना शेखला पुढील शिक्षणासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने शबानाला अनाथ प्रमाणपत्र ( orphan certificate to Shabana ) देण्यात आले होते. त्यामुळे अधिकच मेहनत व जिद्दीने अभ्यास करून तिने स्वप्न सत्यात उतरून दाखवले आहे.

मेहनत व जिद्दीने अभ्यास करून मिळविले यश

हेही वाचा-Rajnath Singh Fell on stage :...आणि मंचावरच कोसळले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
अनाथ कोट्यातून ‘एमबीबीएस’ला प्रवेश ..
शबानाने लहानपणापासूनच संस्थेत राहून महाविद्यायीन शिक्षण कष्टाने घेत, इयत्ता बारावीची परीक्षा दिली व त्यात तिला घवघवीत यश मिळविले. त्यानंतर तिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी ‘नीट’ची परीक्षाही उत्तीर्ण झाली. त्यानंतर पुढील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तिने अनाथ कोट्यातून अर्ज केला. तिला औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे.

हेही वाचा-Bail Granted To Hindustani Bhau: हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप
तिच्या यशाचे कौतुक करण्यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शबानाला पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून शुभेच्छा दिल्या आहेत. अनाथ प्रमाणपत्राचा लाभ घेऊन औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळविलेल्या शबाना शेखचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा-Thane Bay Area : ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; राज्याचा केंद्र सरकारला प्रस्ताव

पुढील शिक्षणासाठी जिल्हा कार्यालयातून मदत
शबानाला पुढील काळात कोणतीही अडचण आल्यास आपण तुझ्यासोबत आहोत, अशा आश्वासक शब्दांत तिचे मनोधैर्य जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी उंचावले. औरंगाबाद येथील शिक्षण काळात काहीही मदत लागल्यास हक्काने सांग आम्ही तुला मदत करू. तुझ्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी होईल, असे ध्येय ठेव. अंबरनाथमध्ये डॉक्टरांची गरज आहे. शिक्षणानंतर तेथे सेवा देण्याचा विचार कर, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बालकल्याण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी शिरसाट, बॉम्बे टीन चँलेंज संस्थेच्या अधिक्षिका पद्मजा गुडे व बालसंरक्षण अधिकारी पल्लवी जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

Last Updated : Feb 17, 2022, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.