नवी मुंबई - वाशी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला तिकीट खडकी व्हावी, यासाठी पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत व नगरसेविका वैजयंती भगत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तिकीट खिडकीच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाला नागरिकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा... IND Vs BAN : दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे ३४३ धावांची आघाडी, अग्रवालचे शानदार द्विशतक
वाशी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला तिकीट खिडकी नसल्यामुळे पूर्व बाजूने जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कित्येक वेळा रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधूनही रेल्वे प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचे भगत यांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही तिकीट खिडकी न झाल्याने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा... काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेनेचे नेते उद्या घेणार राज्यपालांची भेट
आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे प्रशासन आणि सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करून व अनेकदा बैठका घेऊन देखील प्रशासनाने डोळेझाक केली आहे. वाशी रेल्वे स्थानक (पूर्वेस) सानपाडा पामबीच बाजूने कायम स्वरूपातील तिकीट खिडकी सुरू करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगितले.
हेही वाचा.. मैलाचा दगड : एचडीएफसीने ओलांडला 7 लाख कोटींच्या भांडवली मूल्याचा टप्पा