ठाणे - दोन वर्षांनतर ऑफलाईन पद्धतीने सुरु झाली आहे. शाळा सुरु झाल्याने मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ठाण्यातील श्रीमा बालनिकेतन या शाळेतील वर्गांमध्ये कोरोनाचे नियम पाळण्यात आले. तसेच, शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे सॅनिटायझेशन, तापमान तपासण्यात ( thane area school reopen ) आलं.
शाळेचा पहिला दिवस म्हटल की १५ जून ही तारीख आठवते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २ वर्ष १५ जूनला शाळेची घंटा वाजली नव्हती. कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत होते. आता १५ जूनला शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी पालक तसेच शिक्षकांमध्ये देखील चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले. ऑफलाईन शिक्षण घेताना कोणतीही अडचण भासत नाही, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. तर, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत असल्याने विद्यार्थ्यांचे तापमान तपासून, सॅनिटायझरची फवारणी करूनच विद्यार्थ्यांना शाळेत घेतले जाते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच शाळा पुन्हा ऑफलाईन शिक्षण सुरू करत आहे, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
हेही वाचा - Nashik School : स्कुल चले हम! विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून थेट शाळेत एंन्ट्री