ETV Bharat / city

ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मीडियावरील बदनामीचा धसका; व्हॉट्सॲपवर सुसाईट नोट व्हायरल करून कार्यकर्त्याची आत्महत्या - activist committed suicide

Suicide In Thane: ग्रामपंचायत निवडणुकीत Gram Panchayat Elections विरोधकांकडून पैसे घेतल्याची सोशल मिडियावर चार जणांनी बदनामीची पोस्ट व्हायरल केली. मात्र सोशल मिडियावरील बदनामी करत असल्याचा धसका घेत, एका आरपीआयच्या कार्यकर्त्याने व्हॉट्सॲपवर सुसाईट नोट व्हायरल करून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही कसारा ग्रामपंचात हद्दीत घडली असून याप्रकरणी बदनामी करणाऱ्या 4 जणांविरोधात कसारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

Suicide In Thane
Suicide In Thane
author img

By

Published : Oct 18, 2022, 8:15 PM IST

ठाणे: ग्रामपंचायत निवडणुकीत Gram Panchayat Elections विरोधकांकडून पैसे घेतल्याची सोशल मिडियावर चार जणांनी बदनामीची पोस्ट व्हायरल केली. मात्र सोशल मिडियावरील बदनामी करत असल्याचा धसका घेत, एका आरपीआयच्या कार्यकर्त्याने व्हॉट्सॲपवर सुसाईट नोट व्हायरल करून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही कसारा ग्रामपंचात हद्दीत घडली असून याप्रकरणी बदनामी करणाऱ्या 4 जणांविरोधात कसारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण बबन जाधव, गणेश भगवान भडांगे, आकाश बबन जाधव, व सागर सखाराम उबाळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर सागर काशिनाथ जाधव (वय, ३५) असे आत्महत्या करणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

प्रचार करत असल्याची अफवा शहापूर तालुक्यातील मोखावणे- कसारा ग्रामपंचायत मधील समतानगरमध्ये मृतक सागर पत्नी व दोन लहान मुलांसह कुटूंबासह राहत होता. तो बैंक औफ महाराष्ट्र, कसारा शाखेत नोकरीला होता. तसेच तो आरपीआयचा कट्टर कार्यकर्ता म्हणून गावात प्रसिद्ध होता. मृतक कसारा ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदान वेळी वार्ड क्रमांक ५ मधील आरपीआयच्या उमेदवार सौ. लिलाबाई जगन्नाथ उबाळे व सरपंचपदाचे उमेदवार प्रकाशवीर यांचा जोमाने प्रचार करत होता. तर आरोपीही आरपीआय पक्षाचे असून मृतकचे मित्र आहे. या 4 ही आरोपींनी विरोधी पक्षाकडून उभा असलेल्या उमेदवाराकडून मृत सागर आणि त्याचा मित्र संजय देवराम चाबुकस्वार या दोघांनी पैसे घेऊन त्यांचा प्रचार करत असल्याची अफवा सोशल मिडियावर व्हायरल करून बदनामी करत होते. याच बदनामीमुळे मानसिक तणावाखाली मृत सागर होता. त्यातच रविवारी १६ ऑक्टोंबरला ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी दुपारी घरी जेवताना मृत सागर याने आपल्या पत्नीला बदनामी बाबत प्रकार सांगितला आहे.

सुसाईड नोट नंतर खळबळ उडाली त्यानंतर सायंकाळी मतदान आटोपल्यानंतर मृत सागरने जनशक्ती या व्हॉट्सॲप ग्रुपवर अतिशय भावूक मेसेज लिहिला. मेसेजमध्ये तो स्वाभिमानी असून संजय चाबुकस्वार व त्याने पक्षाशी व समाजाशी गद्दारी केली नसल्याचे स्पष्ट लिहून, बदनामी करणा-यांना माफ करु नका, शेवटचा जयभीम व पत्नी वर्षाला मुलांची व कुटुंबांची काळजी घ्यावी असे ह्रदयद्रावक, भावूक मॅसेज मतदानाच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता व्हायरल केला. मृत सागरच्या सोशल मिडियावरील सुसाईड नोट नंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर मित्र व त्याच्या नातेवाईकांना त्याचा शोध घेत होते. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी १६ ऑक्टोंबरला साधारण रात्री ९ वाजेपर्यंत मृत सागर व्हॉट्सॲपवर online होता. मात्र रात्री ११ वाजता सागरचा मृतदेह कल्याण- कसारा मार्गावरील जव्हार फाटा रेल्वे ट्रॅकवर आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत सागराचा मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला.

कसारामध्ये तणावाचे वातावरण निर्माण दरम्यान मृत सागरच्या संतप्त नातेवाईकांनी संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात यावा, व तातडीने अटकेची कारवाई होईपर्यंत सागरचे अंत्यसंस्कार न करता कसारा पोलिस ठाण्यात आणून ठेवू असा पवित्रा घेतलामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र शहापूर पोलिस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे व कसारा पोलिस सहा पोलिस निरीक्षक संदिप गित्ते यांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले. १७ आक्टोंबरला मतमोजणीच्या अंतिम निकालात आरपीआयचे सरपंच उमेदवार प्रकाश वीर विजयी झालेचे घोषित झाले. मात्र सागरच्या आत्महत्या घटनेमुळे कसारा शहरात विजयाचा आनंद वा जल्लोष साजरा केला गेला नाही. तर या घटनेमुळे संपूर्ण कसारामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चार आरोपींना अटक ठाणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक एन. ढवळे म्हणाले, आरपीआयचा नेता निवडणुकीत पराभूत व्हावा, यासाठी विरुद्ध पक्षाकडून पैसे घेऊन ते दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देत असल्याचा संदेश सोशल मिडीयावर सागरच्या पक्षातील 4 कार्यकर्ते पसरवत होते, असे मृताने सुसाईट नोटमध्ये नमूद केले आहे. मात्र, तो पूर्णपणे आपल्या पक्षाशी एकनिष्ठ होता. आणि त्या चौघांच्या अफवांमुळे दुखावला गेल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. कसारा पोलीस पथकाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली 4 आरोपींना १७ ऑक्टोंबर रोजी अटक केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.