ठाणे - एटीएस टीमला मनसुख प्रकरणात दोन आरोपींना पकडल्यावर मोठे यश मिळाले आणि त्यांची तपास चक्रे जोराने फिरू लागली. त्याचाच भाग म्हणून यातील विनायक शिंदे या आरोपीला पहिल्यांदा वाझे यांच्या घरी नेण्यात आले. त्याठिकाणी मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी एटीएसची टीम शिंदे यांच्या घरी म्हणजे कळवा भागात पोहचली.
एटीएस लवकरच लावेल छडा -
शिंदे यांच्या घरी वाझे यांच्या घरात मिळालेल्या माहितीची तपासणी करून एटीएसची टीम मुंब्रा रेती बंदर रोड ज्या ठिकाणी मनसुखचा मृतदेह सापडला होता. विनायक शिंदे याला मनसुख यांचा मृतदेह ज्या ठिकाणी मिळाला तेथे नेण्यात आले आहे, म्हणजे या प्रकरणात ते गुंतलेले असल्याचे दिसत आहे. कारण यातील दूसरा आरोपी बुकी नरेशला अजूनतरी घटनास्थळावर नेण्यात आलेले नाही. मनसुख हिरेन यांच्या मृतदेहासोबत जे चार-पाच जण संशयित होते त्यामध्ये शिंदे हा एक असावा, असे सध्याच्या तपास चक्रावरून समोर येत आहे. एटीएस लवकरच मनसुख प्रकरणाचा छडा लावेल असे दिसत आहे.
हे ही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात एटीएसला यश
रेती बंदरवरून पुन्हा एटीएस कार्यालयात -
यायाधी विनायक शिंदे याला त्याच्या कळवा येथील घरी सुद्धा घेऊन जाण्यात आले होते. त्यानंतर त्याला आता रेती बंदरवरून पुन्हा एटीएस कार्यालयात आणण्यात आले.
हे ही वाचा - परमबीर सिंग यांचा गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न - नवाब मलिक